• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जम्मू येथे देशसेवा बजावताना मंगळवेढ्याच्या जवानाला वीरमरण; वैभव आवताडे यांचे देशासाठी सर्वोच्च बलिदान

Yes News Marathi by Yes News Marathi
August 16, 2026
in Blog
0
जम्मू येथे देशसेवा बजावताना मंगळवेढ्याच्या जवानाला वीरमरण; वैभव आवताडे यांचे देशासाठी सर्वोच्च बलिदान
0
SHARES
5
VIEWS

सोलापूर – देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथील जवान वैभव तात्यासाहेब आवताडे (वय ३१) यांना वीरमरण आले. भारतीय लष्कराच्या मराठा सिग्नल रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेल्या या जवानाच्या निधनाची अधिकृत माहिती शुक्रवारी दुपारी कुटुंबीयांना देण्यात आली. या दुःखद बातमीने गणेशवाडीसह संपूर्ण मंगळवेढा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.


अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून संघर्ष करत वैभव आवताडे यांनी सुमारे ११ वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात प्रवेश केला होता. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी आपल्या कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. जम्मू येथील आव्हानात्मक परिस्थितीत सेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आले. वैभव हे काही दिवसांपूर्वीच सुट्टी संपवून पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले होते. १३ ऑगस्टच्या रात्री सुमारे ११ वाजता त्यांनी पत्नी आणि आई-वडिलांशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता. कुटुंबीयांची आपुलकीने विचारपूस करणारा हा संवाद त्यांचा शेवटचा ठरेल, याची कल्पना त्यावेळी कोणालाही नव्हती.
वैभव आवताडे यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, भाऊ, पत्नी दिपाली आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. अवघ्या सहा वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना ३ वर्षांची मुलगी देवांशी आणि १ वर्षाचा मुलगा देवांश आहेत. त्यांच्या निधनामुळे या दोन्ही चिमुकल्यांच्या डोक्यावरील पितृछत्र कायमचे हरपले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वीर जवान वैभव आवताडे यांचे पार्थिव विशेष विमानाने पुणे येथे आणण्यात येणार असून, त्यानंतर लष्करी वाहनातून त्यांच्या मूळ गावी गणेशवाडी येथे नेण्यात येईल. गावात शोकाकुल वातावरणात अंत्ययात्रा काढल्यानंतर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

या कठीण प्रसंगी शासनाने तसेच समाजाने वीरपत्नी दिपाली आवताडे आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुलांसह संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हीच या वीर जवानाला खरी श्रद्धांजली ठरणार आहे

Previous Post

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

Related Posts

कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी ; एका तासात कोकणात पोहोचणार ; जाणून घ्या अधिक माहिती …
Blog

कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी ; एका तासात कोकणात पोहोचणार ; जाणून घ्या अधिक माहिती …

November 16, 2026
आंबे विहीर दुर्घटनेतील मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत
Blog

आंबे विहीर दुर्घटनेतील मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत

November 16, 2026
पंढरपूरच्या कॉरिडोर संदर्भात ही महत्त्वाची अपडेट…!
Blog

पंढरपूरच्या कॉरिडोर संदर्भात ही महत्त्वाची अपडेट…!

November 14, 2026
सोलापुरात रंगणार २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान प्रिसिजन गप्पांची दिवाळी
Blog

सोलापुरात रंगणार २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान प्रिसिजन गप्पांची दिवाळी

November 13, 2026
शेतकरी शांत; आता तोडणी मजूर आणि वाहनचालक आक्रमक
Blog

शेतकरी शांत; आता तोडणी मजूर आणि वाहनचालक आक्रमक

November 12, 2026
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा; राज्याच्या राजकारणात नवा अध्याय?
Blog

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा; राज्याच्या राजकारणात नवा अध्याय?

November 12, 2026
Next Post
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात

November 17, 2026
आ. कल्याणशेट्टी,आ.राऊत यांच्यासह 10 बिनविरोध, नऊ जागांसाठी 22 जण रिंगणात

आ. कल्याणशेट्टी,आ.राऊत यांच्यासह 10 बिनविरोध, नऊ जागांसाठी 22 जण रिंगणात

November 17, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती

November 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026