• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

Yes News Marathi by Yes News Marathi
August 14, 2026
in मुख्य बातमी
0
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. देशभक्तीचा संदेश, पर्यावरण संवर्धन तसेच सायकल वापरातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या रॅलीला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोलापूर महानगरपालिका आवारातून सकाळी ठीक ६.०० वाजता रॅलीला सुरुवात झाली. उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर, स्थायी समिती सभापती रंजीत चाकोते व कामगार व समाजकल्याण सभापती श्रद्धा पवार, गटनेत्या वहिदा शेख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.


रॅलीच्या प्रारंभी उपस्थितांच्या वतीने ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सामूहिक गायन करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला होता. सायकल रॅलीचा मार्ग सोलापूर महानगरपालिका आवार – पार्क चौक – भैय्या चौक – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी चौक – नवी पेठ – लकी चौक – किल्ला बगीचा परिसर – पार्क चौक – डफरीन चौक – सोलापूर महानगरपालिका आवार असा होता. विविध भागांतून मार्गक्रमण करत रॅलीची सांगता पुन्हा महानगरपालिका आवारात झाली.

यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी उपस्थित सायकलप्रेमी, नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच देशभक्तीसोबतच पर्यावरण संरक्षण, प्रदूषणमुक्त शहर आणि निरोगी सोलापूर यासाठी सायकलचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. स्थायी समिती सभापती रंजीत चाकोते यांनी रॅलीत सहभागी झालेल्या सर्व सायकलप्रेमी, नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत, अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होत असल्याचे नमूद केले. सायकल रॅलीच्या माध्यमातून ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश घराघरात पोहोचविण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी स्थापत्य समिती सभापती विजय चिप्पा, नगरसेविका वाहिदा शेख, नगरसेवक प्रशांत पल्ली, उपायुक्त सोनाली यादव, मुख्य लेखापाल रत्नराज जवळगेकर, प्रशासन अधिकारी माने, सहाय्यक आयुक्त युवराज गाडेकर, समाज विकास अधिकारी अजित खानसोळे, लाईट विभाग अधीक्षक इंगळे, उद्यान विभाग अधीक्षक कोमल काशीद, पर्यावरण संवर्धन अधिकारी अक्षय मोरे, पशुसंवर्धन अधिकारी सतीश चौगुले, पर्यावरण अधिकारी स्वप्निल सोलंकर यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व सायकलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर सायकल रॅलीच्या आयोजनासाठी रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशन, सोलापूरचे प्रमुख अभिनय बावठणकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

रॅलीनंतर सहभागी सभासद व सायकलप्रेमींसाठी महानगरपालिका आवारात चहा, बिस्कीट व केळीची व्यवस्था करण्यात आली होती.
‘हर घर तिरंगा’, देशभक्ती, निरोगी जीवनशैली आणि पर्यावरण संवर्धन असा त्रिसूत्री संदेश देणारी ही सायकल रॅली उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.

Previous Post

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

Next Post

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

Related Posts

सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!
मुख्य बातमी

सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!

October 2, 2026
बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाचे युवा महोत्सवावर पुन्हा निर्विवाद वर्चस्व!
मुख्य बातमी

बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाचे युवा महोत्सवावर पुन्हा निर्विवाद वर्चस्व!

October 1, 2026
आयुक्तांचे आदेश कर्मचारी बसवतात धाब्यावर !
मुख्य बातमी

आयुक्तांचे आदेश कर्मचारी बसवतात धाब्यावर !

October 1, 2026
सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!
मुख्य बातमी

सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!

October 2, 2026
निवडणूक आयोगामुळे भाजप बॅक फुटवर,काँग्रेस आणि विरोधक आक्रमक
मुख्य बातमी

निवडणूक आयोगामुळे भाजप बॅक फुटवर,काँग्रेस आणि विरोधक आक्रमक

September 30, 2026
सांगा कसं जगायचं..? 265 तालुक्यात दुष्काळ…365 दिवस कसे जायचे…!
मुख्य बातमी

सांगा कसं जगायचं..? 265 तालुक्यात दुष्काळ…365 दिवस कसे जायचे…!

September 29, 2026
Next Post
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

October 2, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026