• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
August 14, 2026
in Blog
0
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : महिलांना लघुउद्योगासाठी आर्थिक बळ देणाऱ्या श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आज उत्साहात संपन्न झाले.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी या पतसंस्थेने मोलाचे काम केले आहे. लोकांचा संस्थेवर विश्वास असेल तरच प्रगती होते. भविष्यातही ही संस्था असेच चांगले काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी पतसंस्थेचे आधारस्तंभ दिनकर देशमुख यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशनही करण्यात आले. “मी नक्कीच वेळ काढून हे आत्मचरित्र वाचेल. देशमुख यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल,” असे गौरवोद्गार पालकमंत्री गोरे यांनी काढले. सोलापूर जिल्ह्यात काम करताना माऊलींच्या पालखी सोहळ्याची सेवा करण्याची संधी मिळाली, याचा आनंद आणि समाधान असल्याचेही ते म्हणाले. या संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या कुटुंबांचे संसार उभे राहावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले की, अध्यक्षा नीता देशमुख आणि सर्व महिला संचालकांच्या मेहनतीमुळे केवळ 4 वर्षांत या पतसंस्थेचा 40 कोटींचा व्यवसाय झाला आहे. पतसंस्था चालवणे ही तारेवरची कसरत आहे. विश्वस्त भावनेतून काम केले तरच संस्था यशस्वी होते. स्वतःच्या मालकीच्या इमारतीत स्थलांतर झाल्याने ठेवीदारांचा विश्वास नक्कीच वाढेल. पुढील पाच वर्षांचे नियोजन करून या संस्थेने वटवृक्षासारखी राज्यभर भरारी घ्यावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, माजी आमदार राजन पाटील, नगरसेविका रोहिणी तडवळकर, श्री. शशिकांत चव्हाण, पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. नीता देशमुख, उपाध्यक्षा संगीता जाधव, अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज, प्रकाश वानकर, अंकुश अवताडे, प्रा. माऊली जाधव, संग्रामसिंह भालके यांच्यासह पतसंस्थेच्या सर्व संचालिका आणि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनकर देशमुख यांनी केले. संचालक महिला मंडळाच्या सहकार्यामुळेच ही संस्था उभी राहिली, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन सचिन मिसाळ यांनी तर आभार प्रवीण ननवरे यांनी मानले.

Previous Post

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

Related Posts

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न
Blog

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026
सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती
Blog

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

August 11, 2026
समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर
Blog

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

August 11, 2026
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया अंतर्गत काढणीपश्चात पायाभूत सुविधा व फ्लेक्झी घटकांसाठी अर्जांचे आवाहन
Blog

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया अंतर्गत काढणीपश्चात पायाभूत सुविधा व फ्लेक्झी घटकांसाठी अर्जांचे आवाहन

August 11, 2026
राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे ८ मोठे निर्णय
Blog

राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे ८ मोठे निर्णय

August 11, 2026
शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन – शंकर गायकवाड
Blog

शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन – शंकर गायकवाड

August 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

August 14, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026