माढा तालुक्याचे आमदार अभिजीत पाटील, माजी आमदार विनायक ब पाटील, विजय शिंदे, यशवंत दादा शिंदे, ह. भ.प. दादा महाराज वसेकर यांच्या हस्ते अरण येथे सकाळी सहा वाजता संपन्न झाली. शिंदेवाडा या ठिकाणी विठ्ठलाच्या पादुकांची पूजा आ.अभिजीत पाटील व माजी आमदार विनायक पाटील यांच्या हस्ते झाली. शिंदे परिवाराचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. संत सावतामाळी अन्नछत्र मंडळास अभिजीत पाटील यांनी दहा पोती साखर दिली.अन्नछत्र च्या वतीने महादेव घाडगे यांनी आमदार अभिजीत पाटील यांचा सत्कार केला.
यावेळी देवस्थान ट्रस्ट सचिव विजय शिंदे, जि प सदस्य भारत आबा शिंदे, हरिदास रणदिवे सर,घनश्याम पाटील,आनंद कुलकर्णी, गणेश सावंत,अमोल पाटील, बालाजी टोणपे, यशवंत दादा शिंदे,सोमनाथ शिंदे, विनायक गाजरे, सावता घाडगे,सतीश घाडगे, संजय शिंदे, डॉक्टर आशिष शेंडगे, दीपक सावंत, आदी उपस्थित होते.











