• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न; विकासकामांना गती, शिक्षण-आरोग्यावर विशेष भर

Yes News Marathi by Yes News Marathi
August 4, 2026
in इतर घडामोडी
0
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न; विकासकामांना गती, शिक्षण-आरोग्यावर विशेष भर
0
SHARES
2
VIEWS

११ तालुक्यांत ११ आदर्श शाळा; ‘शिवरत्न सभागृह’चे ‘अटल सभागृह’ नामकरणाचा ठराव उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी सभागृहापुढे मांडला.

सोलापूर : जिल्हा परिषद सोलापूरच्या स्थायी समितीची बैठक अध्यक्ष तथा सभापती दीपक अरुण वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात झाली. जिल्ह्याच्या विकासकामांना गती देतानाच गुणवत्ता, पारदर्शकता आणि नागरिकांना प्रभावी सेवा मिळण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

शिक्षण विभागाच्या आढाव्यात ११ तालुक्यांत ११ आदर्श शाळा उभारण्याचा निर्धार करण्यात आला. प्रत्येक तालुक्यात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.आरोग्य विभागाच्या चर्चेत सर्पदंश व रेबीज प्रतिबंधक उपाययोजना, तसेच आरोग्य संस्थांमध्ये औषधांचा सुरक्षित साठा करण्यासाठी आवश्यक जागेची उपलब्धता या विषयांवर चर्चा झाली. ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक नियोजन करण्यावर भर देण्यात आला.जिल्हा परिषदेच्या ‘शिवरत्न सभागृहाला ‘अटल सभागृह’ असे नामकरण करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी सादर केला .

यावेळी जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. कामांची गुणवत्ता, निधीचा योग्य वापर आणि पारदर्शकता याबाबत संबंधित विभागांनी दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी विभागांमध्ये प्रभावी समन्वय ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.बैठकीच्या प्रारंभी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर २५ जून २०२६ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीचे कार्यवृत्त वाचून कायम करण्यात आले. शासनाकडून प्राप्त महत्त्वपूर्ण परिपत्रके व शासन निर्णयांचे वाचन करून नोंद घेण्यात आली.

बैठकीस उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समिती सभापती इंद्रजीत गुलचंद्र पवार, शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतनसिंह तात्यासाहेब केदार, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती रामप्पा चंद्रशेखर चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समिती सभापती अमृता नागनाथ वाघे, समाजकल्याण समिती सभापती संस्कृती राम सातपुते, समिती सदस्य पृथ्वीराज दिलीप माने, आदिनाथ नरहरी देशमुख, रश्मी दिगंबर बागल, बालाजी तुळशीराम नरुटे आणि रमेश श्रीमंत भांजे उपस्थित होते.

प्रशासकीय स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य सचिव सूर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा व वित्ताधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते

Previous Post

प्रथम मुडगी, हिमांशु व्हनगावडे, पृथा ठोंबरे, समरजीत देशमुख, शामे पार्थ, साई गिथिका आणि बाबाजी यांना आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त

Next Post

सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती

Related Posts

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
इतर घडामोडी

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

August 4, 2026
मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली
इतर घडामोडी

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ
इतर घडामोडी

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
Next Post
सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती

सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती

सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती

August 4, 2026
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न; विकासकामांना गती, शिक्षण-आरोग्यावर विशेष भर

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न; विकासकामांना गती, शिक्षण-आरोग्यावर विशेष भर

August 4, 2026
प्रथम मुडगी, हिमांशु व्हनगावडे, पृथा ठोंबरे, समरजीत देशमुख, शामे पार्थ, साई गिथिका आणि बाबाजी यांना आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त

प्रथम मुडगी, हिमांशु व्हनगावडे, पृथा ठोंबरे, समरजीत देशमुख, शामे पार्थ, साई गिथिका आणि बाबाजी यांना आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त

August 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026