• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

Yes News Marathi by Yes News Marathi
August 3, 2026
in इतर घडामोडी
0
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : स्व. विष्णुपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांच्या वाटपाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. वसंतराव नाईक हायस्कूल व समता मराठी विद्यालयात हा कार्यक्रम झाला.

याप्रसंगी व्यासपीठावर आमदार देवेंद्र कोठे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निर्मला जंगम, नगरसेवक रवी कैय्यावाले, भारतसिंग बडूरवाले, नगरसेविका श्वेता खांडेकर, माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, माजी नगरसेवक जेम्स जंगम, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, लोधी समाज अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले, अक्षय वाकसे, रणजितसिंग दवेवाले, अविनाश बेंजरपे, अनंत गोडलोलू, हरीश जंगम, ओंकार होमकर, सुरज विटे, घनश्यामसिंग शिवसिंगवाले, अर्जुन नामदास, अक्षय शिवसिंगवाले, मोहन बाडिवाले, राहुल म्हेत्रे, मागास समाज सेवा मंडळ, नेहरूनगर संचलित संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण, मुख्याध्यापक कार्तिक चव्हाण, पर्यवेक्षक युवराज पारधे उपस्थित होते.

भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च करण्यापेक्षा आमदार देवेंद्र कोठे यांनी स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे ५६ हजार वाटप करण्यास प्रारंभ करून समाजाप्रतीची संवेदनशीलता पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. लोकप्रतिनिधी कसा असावा याचे आमदार देवेंद्र कोठे हे उत्तम उदाहरण आहेत. आमदार देवेंद्र कोठे हे नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी कायम तत्पर असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते लाडके असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांचेदेखील त्यांच्यावर विशेष लक्ष आहे, असे रोहिणी तडवळकर यांनी सांगितले. सोलापूर शहरासाठी शासनाच्या विविध योजना, निधी, मदत मिळवण्यामध्ये आमदार देवेंद्र कोठे यांचा सिंहाचा वाटा आहे. बी टू सारखा सुमारे ८० वर्षापासूनचा अत्यंत जटिल प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून सोडविल्यामुळे खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्यांचे कौतुक केले आहे. सोलापूर शहरातील झोपडपट्ट्यांचे निर्मूलन करून नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या घरात राहता यावे यासाठी आमदार देवेंद्र कोठे प्रयत्नशील आहेत. मागील तीन वर्षांपासून सोलापुरातील अनेक शाळांमध्ये हजारो मुलांना वह्या वाटून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सामाजिक जाणीव ठेवून साजरा केला आहे, असेही भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी सांगितले.

आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च करण्यापेक्षा समाजातील गोरगरीब, होतकरू, गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करता येणे याचे समाधान वेगळे आहे. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनीच समाजातील गरजूंना मदत करून आपल्या तसेच आपल्या नेत्यांचे वाढदिवस साजरे करणे यातच या उपक्रमाचे यश आहे. मुलांनी शिकून मोठे व्हावे आणि स्वतः कमावते झाल्यानंतर समाजातील गरजू आणि होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी मदत करावी यातूनच हे मदतीचे पर्यायाने समाज सुधारणेचे चक्र चालत राहणार आहे, असेही आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिष्ठानचे अभिषेक चिंता, अंबादास सकीनाल, त्रिमूर्ती बल्ला, पवन खांडेकर, ओंकार राजगे, अभिषेक बोल्ली, नागेश म्हेत्रे, सागर बल्ला, उदयराज गुलापल्ली, अमर शिंदे, लकी दिवेकर तसेच सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

पुढील दोन दिवसात ड्रेनेजची लाईन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 56 हजार वह्या वाटपाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी आमदार देवेंद्र कोठे हे वसंतराव नाईक हायस्कूलमध्ये येत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वारात त्यांना फुटलेल्या पाईपमधून सांडपाणी वाहताना दिसले. त्यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी संबंधितांना पुढील दोन दिवसात या ठिकाणी ड्रेनेजची पाईपलाईन टाकण्याच्या सूचना दिल्या. आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यतत्परतेचे भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनीही आपल्या भाषणातून कौतुक केले.

Previous Post

अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आ.देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

Related Posts

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली
इतर घडामोडी

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
इतर घडामोडी

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
Next Post
मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; प्रत्येक आठवड्याला होणार प्रगतीचा आढावा : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; प्रत्येक आठवड्याला होणार प्रगतीचा आढावा : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

August 3, 2026
मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026