• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य महान; त्यांचे विचार तळागाळात पोहोचवा – आमदार कल्याणशेट्टी

Yes News Marathi by Yes News Marathi
May 25, 2026
in मुख्य बातमी
0
अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य महान; त्यांचे विचार तळागाळात पोहोचवा – आमदार कल्याणशेट्टी
0
SHARES
8
VIEWS

सोलापूर विद्यापीठात जयंती सप्ताह, चित्र व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत आदर्श व सर्वसमावेशक राज्यकारभार घडवून राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्याचा वारसा आणि विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे आयोजित त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या सांगता सप्ताहाचे तसेच चित्र व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर होते. यावेळी माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. अनिल घनवट आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी दि. २५ ते ३१ मे २०२६ या आठवड्यात विद्यापीठातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली.

आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरातील अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार करण्याबरोबरच विहिरी, घाट, बारवांची निर्मिती केली. अहिल्यादेवी होळकर यांचे कर्तुत्व मोठे होते. विद्यापीठाने आज त्यांचा वारसा जपत चांगली प्रगती करत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. डॉ. इरेश स्वामी म्हणाले, 2004 मध्ये स्थापन झालेल्या विद्यापीठाने अल्पावधीत उत्तुंग प्रगती केली आहे. प्रथम कुलगुरू म्हणून हा विकास पाहताना अभिमान वाटतो. तसेच त्यांनी अहिल्यादेवी होळकर व महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.

कुलगुरू डॉ. महानवर यांनी सांगितले की, अहिल्यादेवींच्या कार्याचा व्यापक सामाजिक प्रभाव जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सप्ताहभर विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत. विद्यापीठात वृक्षारोपणाचा मोठा उपक्रम सुरू असून समाजातील विविध घटक त्यास सक्रिय सहाय्य करीत आहेत. कौशल्य विकासाबरोबरच विविध भाषांचे प्रशिक्षण अभ्यासक्रम शहरात सुरू करण्याची विद्यापीठाची योजना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्रामध्ये ग्रंथ प्रदर्शन सर्वांसाठी खुले करण्यात आले असून अहिल्यादेवींची दुर्मिळ चित्रेही येथे पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. विद्यार्थी व नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाने विद्यापीठास ५ हजार पुस्तकांची देणगी दिली. त्याबद्दल स्मारक मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, गंगाधर गवसने, वरदराज बंग, प्रसाद जिरांकलगीकर, माधवी कुलकर्णी, पुरुषोत्तम कारकल आदींचा सत्कार करण्यात आला. माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांनीही पुस्तके भेट दिली. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, प्रा. सचिन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे व प्रा. श्रुती देवळे यांनी केले. आभार डॉ. अनिल घनवट यांनी मानले.

फोटो ओळ:
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सप्ताह तसेच चित्र व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. केदारनाथ काळवणे, डॉ. अनिल घनवट व अन्य.

Previous Post

जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

Next Post

अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

Related Posts

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
Next Post
अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद - कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026