• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नागरी समस्या आणि प्रलंबित विकासकामांच्या पाठपुराव्यासाठी मनपा आयुक्तांच्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये भेटी

Yes News Marathi by Yes News Marathi
April 21, 2026
in मुख्य बातमी
0
नागरी समस्या आणि प्रलंबित विकासकामांच्या पाठपुराव्यासाठी मनपा आयुक्तांच्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये भेटी
0
SHARES
2
VIEWS

अधिकाऱ्यांना दिल्या सूचना : नगरसेवकांची जाणून घेतली मते

सोलापूर – जनतेला भेडसावणाऱ्या नागरी समस्या आणि प्रलंबित विकासकामांच्या पाठपुराव्यासाठी मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी मंगळवारी प्रभाग क्रमांक आठ मधील विविध ठिकाणांना भेटी दिल्या यावेळी महापालिका आयुक्तांनी नगरसेवकांची मते जाणून घेत संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी थेट जागेवर पाहणी करण्याबाबत आमदार विजयकुमार देशमुख आणि महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांची चर्चा झाली होती. त्यानंतर नगरसेवक प्रविण दर्गोपाटील यांनी मनपा आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांना प्रभागाची पाहणी करण्याची विनंती केली होती. मंगळवारी हा पाहणी दौरा झाला. यावेळी अनंतकुमार धुम्मा, श्रीरंग गवई, किसन गर्जे, गुरुनाथ निंबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाहणी दौऱ्याची सुरुवात श्री मारुतीरायाची आरती करून करण्यात आली. त्यानंतर राणी लक्ष्मीबाई मंडई परिसराची पाहणी करत नागरिक व व्यापाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. स्वच्छतागृह, वाहनतळ आणि अनधिकृतरीत्या रस्त्यावर बसणाऱ्या व्यापाऱ्यांबाबत सुधारणा करण्याचे निर्देश देत, आवश्यक असल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.

यानंतर पूर्व विभागातील विणकर उद्यान येथे भेट देऊन उद्यानाचा हरित पद्धतीने विकास करण्यासाठी हिरवळ, फुलबाग, सिंचन व्यवस्था, पाण्याचे कारंजे व सुरक्षित भिंत उभारण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच वातानुकूलित आकांक्षी स्वच्छतागृह एक आठवड्यात सुरू करावे आणि उद्यानात येणाऱ्या नागरिकांसाठी स्वच्छतागृहापर्यंत स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जमखंडी पूल परिसरातील इच्छाप्राप्ती श्री गणेश मंदिराजवळील नाल्यावर नवीन पूल उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच जमखंडी पूल ते गणेश पेठ व्यापारी संकुलपर्यंत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्याची सफाई करून दुतर्फा संरक्षण भिंत उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रभागातील भूमिगत विद्युत लाईनवरील नादुरुस्त कव्हरची पाहणी करून ती तातडीने दुरुस्त करण्याचे आदेशदेखील संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले.

दरम्यान, आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन समस्या ऐकून घेतल्याबद्दल प्रभाग ०८ वतीने नागरिकांनी त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला. या पाहणी दौऱ्यावेळी आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, नगरसेवक प्रविण दर्गोपाटील, अनंतकुमार धुम्मा, श्रीरंग गवई, विभागीय अधिकारी सावंत, मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे, कनिष्ठ अभियंता चेतन प्रचंडे, श्रीविद्या गुत्ती, मुख्य आरोग्य निरीक्षक सोमाजी साबळे, जयकुमार कांबळे, आरोग्य निरीक्षक हमीद हिरोळी, सोमनाथ सिद्धगणेश, पांडुरंग कंदी, शेषेराव शिरसाट आदींसह मनपा अधिकारी, कर्मचारी व प्रभाव ०८ मधील नागरिकांची उपस्थिती होती.

जनतेला दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींचे निराकरण जलद गतीने व्हावे याकरिता महापालिका आयुक्तांचा हा पाहणी दौरा झाला. समस्यांचा तातडीने निपटारा करण्याचा आमचा प्रयत्न असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही चारही नगरसेवक कटिबद्ध आहोत.
— प्रविण दर्गोपाटील, नगरसेवक, प्रभाग क्रमांक ८

Previous Post

लातूर पॅटर्नचे जनक डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी

Next Post

मॉरिशस शांती परिषदेसाठी डाॅ.महावीर शास्त्री दाम्पत्यांना आमंत्रण

Related Posts

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
Next Post
मॉरिशस शांती परिषदेसाठी डाॅ.महावीर शास्त्री दाम्पत्यांना आमंत्रण

मॉरिशस शांती परिषदेसाठी डाॅ.महावीर शास्त्री दाम्पत्यांना आमंत्रण

ताज्या बातम्या

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026