सोलापूर शहरात जागतिक बँकेच्या सहकार्याने 1378 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव आज होणाऱ्या महापालिका सभेत मंजूर होणार आहे. ही योजना करण्यासाठी महापालिका प्रशासन टॅक्स वाढविण्याच्या विचाराधीन असल्यामुळे आमदार सुभाष देशमुख तसेच आमदार विजयकुमार देशमुख यांनी याच प्रश्नावरून महापालिका आयुक्तांना जाब विचारला. आमदार देवेंद्र कोठे यांच्या गटाने आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन आम्ही टॅक्स वाढवणार नाही असे सांगितले. तेराशे 78 कोटी रुपयांच्या या योजनेत सुमारे बाराशे किलोमीटरची अंतर्गत जलवाहिनी टाकणे,विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधणे, अशा अनेक कामांचा समावेश आहे यामध्ये जागतिक बँकेकडून सोलापूर महापालिकेसाठी 600 कोटी रुपयांचं अनुदान मिळणार आहे तर महापालिकेला साडेतीनशे कोटी रुपये कॉन्ट्रीब्युशन भरावी लागणार आहे आणि तेवढीच रक्कम बॉण्डच्या रूपाने उभा करावी लागणार आहे. या विषयांमध्ये अनेक गुंतागुंत असून आजच्या सभेत अनेक विषय चर्चेला येणार आहेत त्यामुळे. आजच्या सभेतच या विषयाचा छडा लागणार आहे.
