• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लिपीक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी अविनाश गोडसे यांची निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
April 17, 2026
in मुख्य बातमी
0
लिपीक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी अविनाश गोडसे यांची निवड
0
SHARES
2
VIEWS

12/04/2026 रोजी सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची संवाद बैठक सोलापूर येथे संपन्न झाली. या संवाद बैठकीत जिल्हा परिषद लिपिकांचे पदोन्नती टप्पे कमी करून लिपीकांना वर्ग-१ पर्यंतचे वेतन कसे मिळेल यावर चर्चात्मक संवाद साधला गेला. या बैठकीत लिपिक वर्गीय संघटनेचे राज्याध्यक्ष सागर बाबर व लिपिक वर्गीय संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष उमाकांत सुर्यवंशी यांनी लिपिकांच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केले.


राज्याध्यक्ष सागर बाबर यांनी जिल्हा परिषद लिपीकांची वेतनत्रुटी आहे काय? या प्रश्नापासून सुरुवात करून लिपीकांचे पदोन्नती टप्पे कमी करून त्यानुसार वर्ग-१ पर्यंतचे वेतन जिल्हा परिषद लिपीकांना कसे मिळवून देता येईल यावर सविस्तर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शना दरम्यान उपस्थित प्रत्येक लिपीकांचे प्रश्नावर संवाद साधला गेला. लिपीकांच्या वेतन त्रुटी चा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे, परंतु शासन त्याला का मान्यता देत नाही यावर त्यांनी सांगितले की, आपण आपल्या पदांची तुलना तांत्रिक पदांसोबत करत आहोत इथेच आपण चुकत आहोत. आपण जिल्हा परिषद लिपिक आहोत तर आपण आपली तुलना राज्य शासनाच्या कार्यालयातील लिपिकांशीच केली पाहिजे परंतु आपण तांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यांसोबत तुलना करत आहोत त्यामुळे जिल्हा परिषदेच्या लिपीकांच्या वेतन त्रुटीचा विषय शासन दरबारी मान्य होत नाही. त्यामुळे लिपीक संघटनेने शासनाकडे निवेदन देऊन राज्यशासनाकडील कार्यालयातील लिपीकांचे टप्यांप्रमाणे जिल्हा परिषदेकडील लिपीकांचे चार टप्यांऐवजी दोन टप्पे करावेत. तसे करताना मंजुर पदांची संख्या कमी करू नये किंबहुना जिल्हा परिषदेकडील कामांची व्याप्ती पाहून सदर पदांमध्ये वाढ करावी. अशी मागणी लावून धरली आहे.


जिल्हा परिषदेच्या लिपीकांचे पदोन्नती टप्पे कमी करणे या विषयी मा.आमदार सत्यजितभाऊ देशमुख शिराळा विधानसभा जिल्हा सांगली यांचे प्रयत्नातून राज्याचे ग्रामविकास मंत्री महोदय मा. नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचेकडे झालेल्या बैठकांबाबतची सविस्तर माहिती यावेळी दिली. त्यामुळे शासन पातळीवर प्रस्तावित कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी दोन पदे लवकरच एक होतील त्यासाठी लिपीक संघटना प्रयत्नशील आहे. याचा फायदा कनिष्ठ लिपीकांपर्यत कसा होईल या विषयावर सखोल चर्चा यावेळी झाली. ही मागणी मान्य झाल्यास अश्वासित प्रगती योजनेमुळे कार्यरत लिपीकांना वरच्या पदांची वेतनश्रेणी मिळणार असून त्यानुसार वेतनत्रुटी कशा प्रकारे दूर होईल याबाबत उदाहरणांसह माहिती राज्याध्यक्ष सागर बाबर यांनी दिली. तसेच वरिष्ठ सहाय्यक लिपीक आणि कनिष्ठ सहाय्यक लिपीक ही दोन पदेही एकत्र करण्यासाठी मा. नामदार जयकुमार गोरे मंत्री ग्रामविकास यांचेकडे मा. आमदार सत्यजितभाऊ देशमुख यांचेमार्फत लिपीक संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे. या विषयाचीही फाईल लवकरच प्रस्तावित होईल त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मा.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ही दोन पदे एकत्र केल्यास शासनास काय फायदा होईल?तसेच या पदांचे कामकाजात कशा प्रकारची समानता आहे याबाबतचा अहवाल शासनाकडून मागितला जाणार आहे. अशी माहिती संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी यांनी दिली. सध्या किमान एक टप्पा कमी होणार आहे तो करून घेऊया राहिलेली मागणी पुन्हा जोरकसपणे शासनाकडे रेटूया अशी संघटनेची सध्याची भूमिका असल्याची माहिती यावेळी दिली.
बैठक सुरू होणे पूर्वी सोलापूर येथील लिपिक नेते कै. विवेक लिंगराज, कुर्डूवाडी चे कै.सयाजी बागल, साप्रवि चे कै.विशाल उंबरे सह ज्ञात अज्ञात लीपिकाना श्रध्दांजली वाहण्यात आली.
सदरील बैठकीस राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सोलापूर जिल्हा लिपिक कार्यकारिणी कडून लिपीक संवाद बैठकीचे उत्कृष्ट नियोजन सर्व लिपीक बंधूनी केले.

या बैठकीनंतर सोलापूर जिल्ह्यातील लिपिकांनी जिल्हा अध्यक्ष पदी बहुमताने अविनाश गोडसे यांची निवड केली. तसेच सोलापूर जिल्हा नविन कार्यकारिणी निवड केली. नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी यांचा सत्कार राज्यअध्यक्ष सागर बाबर यांनी केला व पुढील संघटनात्मक कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद नांदेड येथून विभागीय अध्यक्ष अशोक कासराळीकर, जिल्हाध्यक्ष कमल दर्डा,जिल्हाध्यक्ष आनंद सावंत,सचिव बालाजी अटकळे,कार्याध्यक्ष विजय थोरात, कोषाध्यक्ष रवि कांबळे, सल्लागार शिवसांभ चेड्डु, उपाध्यक्ष ओंकार पांचाळ, सहकोषाध्यक्ष ठोंबरे , अनिल जगताप, नागेश पाटील,नागेश धोत्रे, सूर्यकांत मोहिते, कुमारगौरव शिंदे, हनुमंत भोसले, दिनेश बनसोडे, विजय कुलकर्णी, सचिन मायनाळ, सचिन घोडके, संजय गौडगाव, इरांना भरडे,आनंद साठे, महेश शेंडगे,विष्णू पाटील, सुमित कांबळे, अमोल धाकपडे, दिलीप भोसले, संतोष सातपुते, एस एस कुंभार, एस डी. गुरव, कोमारी, रमाकांत उकिरडे, डी.ए. लांगोटे, के.एन.खुर्द, एस.एस.मोरे, एस.एस.देशमाने, निंबाळकर, विजय रणदिवे, एस.एन.बडे, संभाजी जाधव, प्रमोद यादव, आर.सी.लोखंडे, एस.जी.शेळके, ए.व्ही.सावंत,एस. ए.कानडे, बी.एस.झालते, एम.एस गिराम,एस. टी.लमकाने,सी.एस.भोसले,आय.ए.सय्यद, एस.आर.जाधव, महेश कुलकर्णी, ज्ञानेश्वर केंगार, विरकुमार देशमुख, पांडुरंग दराडे, अजय रंगदाळ ,प्रवीण डोळे, राहुल मुंढे, रणजित कांबळे, स्वप्नील कोरे, अनिल खडतरे, एस.ए.देशमुखआदि सर्व जन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश काळे यांनी केले.

Previous Post

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर

Next Post

साक्षी वाघमोडेची अष्टपैलू कामगिरी; सोलापूरचा कोल्हापूरवर ४ गडी राखून विजय

Related Posts

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
Next Post
साक्षी वाघमोडेची अष्टपैलू कामगिरी; सोलापूरचा कोल्हापूरवर ४ गडी राखून विजय

साक्षी वाघमोडेची अष्टपैलू कामगिरी; सोलापूरचा कोल्हापूरवर ४ गडी राखून विजय

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026