सोलापूर महापालिकेतील नगर रचना संचालक मनीष बिश्नुरकर यांची 18 मार्च रोजी वसई विरार महापालिकेसाठी बदली झाली आहे तर त्यांच्या ठिकाणी पुणे येथे कार्यरत असलेल्या विनय झगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जवळपास पंधरा दिवसाच्या गॅप नंतर झगडे यांनी सोलापूर महापालिकेच्या नगररचना संचालकाचा बुधवारी पदभार स्वीकारून ते लगेच रजेवर गेले. त्यामुळे महापालिकेतील बांधकाम परवाने,टी डी आर रोड कर लोड करणे, साईट व्हिजिट करणे अशी कितीतरी कामे प्रलंबित राहिले आहेत. सोलापूर शहरात खूप मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असताना नगररचना विभाग तसेच महापालिकेच्या बांधकाम विभागातील दिरंगाईमुळे याचा फटका बांधकाम व्यवसायिकाला बसत आहे. महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी केली आहे.
