• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात प्रभाकर स्वामी महाराज पुण्यतिथी महोत्सव २ फेब्रुवारीपासून

Yes News Marathi by Yes News Marathi
January 30, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापुरात प्रभाकर स्वामी महाराज पुण्यतिथी महोत्सव २ फेब्रुवारीपासून
0
SHARES
0
VIEWS

४ फेब्रुवारी रोजी निघणार भव्य मिरवणूक भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन

सोलापूर : श्री सदगुरु प्रभाकर स्वामी महाराज यांचा ६९ वा पुण्यतिथी महोत्सव सोमवार, २ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानिमित्त सम्राट चौक येथील श्री सदगुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री सदगुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे चीफ ट्रस्टी मोहन बोड्डू यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

श्री सदगुरु प्रभाकर स्वामी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे गुरुगीता पारायण करण्यात येत असून सोमवार २ फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी ८ ते ९ या वेळेत गुरुगीता पारायण होईल.

शनिवार, दि. ३१ रोजी सायंकाळी ५ ते ७ दरम्यान श्री संत ज्ञानेश्वर महाराज मृदुंगवादन शिक्षण संस्था व संगीत वि‌द्यालयातील ५० बाल वारकऱ्यांचे सामूहिक मृदंग वादन होईल. रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता पौर्णिमेनिमित पालखी प्रदक्षिणाचा कार्यक्रम होणार आहे.

सोमवार, २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता गुरुगीता पारायण समाप्ती व श्री प्रभाकर स्वामी महाराजांच्या पिंडीस रुद्राभिषेक व दुपारी तर्पण विधी ट्रस्टी श्री उदय वैद्य यांच्या हस्ते व ब्रम्हावृंदांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होईल. त्याचदिवशी रात्री १०.४५ वाजता सम्राट चौक येथील श्री सद् गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत गुलालाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दि. ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत भाविकांना लाडू प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील उपस्थित राहणार आहेत.

तर बुधवार दि ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता श्री सद् गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते होईल. सम्राट चौक येथून निघालेली ही मिरवणूक पारंपारिक मार्गावरून रात्री ९ वाजता पुन्हा मंदिरात विसर्जित होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टी उदय वैद्य यांनी याप्रसंगी केले.

या पत्रकार परिषदेस श्री सद्‌गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे, ट्रस्टी उदय वैद्य, वसंत बंडगर, वामन वाघचौरे, मंदिर ट्रस्टचे सदस्य सर्वश्री रवी गुंड, सम्राट राऊत, सुभाष बदूरकर, रमेश देशमुख, मंदिराचे व्यवस्थापक श्री निरंजन दंतकाळे, भजनी मंडळाचे दत्तात्रय कुसेकर, श्री कोथिंबीरे मंदिराच्या प्रसारण विभागाचे प्रमुख परशुराम व्हटकर आदी उपस्थित होते.

Previous Post

मुलाचा खून; बापाला जन्मठेप

Next Post

TOP 25 । उद्या ठरणार भाजपचा गटनेता आणि सोमवारी महापौर..!

Related Posts

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
Next Post
TOP 25 । उद्या ठरणार भाजपचा गटनेता आणि सोमवारी महापौर..!

TOP 25 । उद्या ठरणार भाजपचा गटनेता आणि सोमवारी महापौर..!

ताज्या बातम्या

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

July 10, 2026
धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026