सध्या प्रांताधिकार्यांना तालुका क्रीडा समित्यांचे अध्यक्ष करण्यात आले होते.शासनाने 21 जानेवारी रोजी शासन निर्णय जारी करत पुन्हा आमदारांनाच क्रीडा तालुका समित्यांचे अध्यक्ष करण्यात आले आहे.या शासन निर्णयानुसार आता पूर्वीप्रमाणेच तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावरील क्रीडा संकुल समितीचे कामकाज चालणार आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर आता जिल्हाधिकाऱ्यांऐवजी पालकमंत्री हे जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तर तालुका स्तरावर त्या त्या तालुक्याचे आमदार तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष असणार आहेत.

