• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 2, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांची कडक कारवाई

by Yes News Marathi
January 14, 2026
in मुख्य बातमी
0
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांची कडक कारवाई
0
SHARES
45
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी दिलेल्या निर्देशानुसार गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

दि. ०९/०९/२०२५ रोजी गुन्हे शाखेचे सपोनि शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाने सलगरवस्ती पोलीस स्टेशन हद्दीतील मोळी कवडे येथे छापा टाकून सुमारे १२५ लिटर गुळमिश्रित रसायन व ८ लिटर रसायनयुक्त हातभट्टी दारू जप्त केली. यामध्ये सुमारे ५२,७५० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. याप्रकरणी कुमार उर्फ बाबु पांडुरंग चव्हाण (रा. मोळे तांडा, ता. उत्तर सोलापूर) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच दि. १२/०९/२०२५ रोजी हॉटेल अँबॅसिडर ते प्रभाकर महाराज मंदिर रोडवर अवैधरीत्या देशी-विदेशी दारू विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या अमोल बाळासाहेब गोरसे याच्याकडून सुमारे १,०३,६६० रुपयांची दारू व दुचाकी जप्त करण्यात आली. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच दिवशी गांधी नगर, अक्कलकोट रोड परिसरात नंदू रामल कोडा याच्याकडून सुमारे १,३३,५०० रुपयांची देशी-विदेशी दारू व ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली. तर कर्णिक नगर परिसरात संदीप विष्णु शिंदे याच्याकडून १,३५,४८० रुपयांची दारू व चारचाकी वाहन जप्त करून जेरबंद करण्यात आले आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त राजन माने व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निवडणूक कालावधीत अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

Previous Post

Next Post

सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रशासनाला निवडणूक कार्यक्रम राबविण्यात अपयश

Next Post
सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रशासनाला निवडणूक कार्यक्रम राबविण्यात अपयश

सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रशासनाला निवडणूक कार्यक्रम राबविण्यात अपयश

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In