• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 2, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

समृद्धी करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुंबईचा यश पाटील विजेता तर महाडचा अमोल गोळे द्वितीय …सुहास आदमाने व डॉ. ऋचा गोडगे समृद्धी युवा पुरस्काराने सन्मानीत

by Yes News Marathi
January 12, 2026
in इतर घडामोडी
0
समृद्धी करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुंबईचा यश पाटील विजेता तर महाडचा अमोल गोळे द्वितीय …सुहास आदमाने व डॉ. ऋचा गोडगे समृद्धी युवा पुरस्काराने सन्मानीत
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – फडकुले सभागृह येथे समृद्धी कला मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समृद्धी करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा मधे मुंबईच्या यश पाटील प्रथम क्रमांक तर महाड चा अमोल गोळे द्वितीय क्रमांक आला आहे. तसेच उद्योजक युवक सुहास आदमाने व वैदयकिय क्षेत्रातील युवती ऋचा गोडगे यांना समृद्धी युवा पुरस्काराने मानपत्र, फेटा, शाल व बुके दे ऊन सन्मानीत करण्यात आले असे समृद्धी सोशल फाऊडेशन चे अध्यक्ष संजय सावंत यांनी कळविले आहे . महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 47 स्पर्धकांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वकौशल्याच्या जोरावर उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी राजन सावंत प्रमुख पाहूणे विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव शिवाजी शिंदे होते. या प्रसंगी ॲड बसवराज सलगर, दीपक काळे, डॉ सुभाष कदम, कृष्णकांत चव्हाण, समचंद्र दत्तू, राजू प्याटी, सुमित फुलमामडी, चंद्रकांत होळकर , मल्हारी बनसोडे, किरण लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. शिवाजी शिंदे सर (सहाय्यक कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ, सोलापूर) यांनी आपल्या ओघवत्या भाषणातून विविध सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकत, “आजची मुले AI शी बोलतात, पण आईशी बोलत नाहीत,” हे वास्तव अधोरेखित केले.व त्यांच्या भाषणाने जीवन कसे जगावे हे त्यांनी काव्यातून सांगितले. समृद्धी कला मंचचे अध्यक्ष कृष्णकांत चव्हाण सर यांनी समाज प्रबोधनासाठी वक्तृत्व स्पर्धांचे महत्त्व प्रास्ताविकात विशद केले. तर समृद्धी सोशल फाऊडेशन चे अध्यक्ष मा. संजय सावंत सर यांनी समृद्धी परिवाराचे कार्य व उपक्रमाविषयी माहिती देऊन सोलापूर जिल्हातील ग्रामीण व शहरी भागातील युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या सुहास आदमाने व ऋचा गोडगे यांच्या बद्दल गौरव उदगार काढले.
राष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून समृद्धी परिवातील युवक युवतीचा सन्मान ट्रॅकसूट देऊन सन्मान करण्यात आला. इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस साठी निवड झालेल्या मयुरेश वाघमारे, सेपक टकरा या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय रौप्यपदक विजेत्या भक्ती घुले, नम्रता सुळकुंडे, समरजित कदम व प्रणिती नागणे यांचा गौरव करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षक प्रा. रोहित देशमुख यांनी उत्तम वक्ता होण्यासाठी उत्तम वाचनाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले, तर प्रा. पंकज पवार सर यांनी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक बाबींवर मार्गदर्शन करत अधिक प्रगल्भ होण्याचा संदेश दिला.

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यांनी पटकावले यश –
प्रथम क्रमांक – यश पाटील (मुंबई)
द्वितीय क्रमांक – अमोल गोळे (महाड)
तृतीय क्रमांक – कार्तिक दराडे (उदगीर)
चतुर्थ क्रमांक – अभय अळशी (मुंबई)
उत्तेजनार्थ – संकेत पाटील (कोल्हापूर)

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमंत कोळी यांनी केले तर आभारप्रदर्शन मल्हारी बनसोडे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्पर्धा प्रमुख मल्हारी बनसोडे, मलीनाथ निंबर्गी, किरण लोंढे, सहकार्यवाह हिरालाल धुळम, श्रीमंत कोळी, अर्चना कलखांबकर व सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी विशेष प्रयत्न केले.

Previous Post

अजित पवारांना सोलापुरात जोरदार झटका ; प्र. क्रमांक 9 ड मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने केला भाजपमध्ये प्रवेश

Next Post

‘सारे’ जमी पर..! ‘भक्ती’ आणि ‘शक्ती’ चे आज सोलापुरात दर्शन..

Next Post
‘सारे’ जमी पर..! ‘भक्ती’ आणि ‘शक्ती’ चे आज सोलापुरात दर्शन..

'सारे' जमी पर..! 'भक्ती' आणि 'शक्ती' चे आज सोलापुरात दर्शन..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In