• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अजित पवारांना सोलापुरात जोरदार झटका ; प्र. क्रमांक 9 ड मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने केला भाजपमध्ये प्रवेश

Yes News Marathi by Yes News Marathi
January 12, 2026
in मुख्य बातमी
0
अजित पवारांना सोलापुरात जोरदार झटका ; प्र. क्रमांक 9 ड मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने केला भाजपमध्ये प्रवेश
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – महापालिका निवडणुकीला अवघे 2 दिवस शिल्लक असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापुरात जोरदार झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या येथील एका अधिकृत उमेदवाराने आज अचानक भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे शहराच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या अनपेक्षित घटनेमुळे शहरातील एका प्रभागातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 9 ड मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार तुषार जक्का यांनी आज सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. सोलापूर महापालिकेसाठी येत्या 15 तारखेला मतदान होणार आहे. त्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराने पक्ष सोडल्यामुळे पक्षाच्या निवडणूक रणनीतीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

भाजप, राष्ट्रवादी व ठाकरे गटात होती तिरंगी लढत

प्रभाग क्रमांक 9 ड मध्ये यापूर्वी भाजपचे उमेदवार मेघनाथ येमूल, राष्ट्रवादीचे तुषार जक्का आणि शिवसेना ठाकरे गटाचे सुरेश गायकवाड यांच्यात तिरंगी लढत होती. राष्ट्रवादीकडून जक्का यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, त्यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे या प्रभागातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मतदानाच्या अगदी तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून पक्षाच्या प्रचारयंत्रणेला मोठा धक्का बसला आहे. या पक्षांतरामुळे भाजपला मात्र मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक पातळीवर प्रभाव असलेले उमेदवार भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे भाजपची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, शिवसेनेच्या ठाकरे गटापुढेही नव्या आव्हानांची निर्मिती झाली आहे.

सोलापूरच्या निवडणुकीची राज्यभरात चर्चा

सोलापूर महापालिकेची निवडणूक सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. एकीकडे भाजपमध्ये काही ठिकाणी अंतर्गत नाराजी आणि बंडखोरीचे सूर उमटताना दिसत आहेत. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीतही जागावाटपावरून मोठ्या प्रमाणात असंतोष पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोर उमेदवार मैदानात उतरले आहेत. गेल्या काही दिवसांत सकाळी एका पक्षात असलेले इच्छुक उमेदवार सायंकाळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचे चित्र सोलापुरात वारंवार पाहायला मिळाले. या सततच्या राजकीय उलथापालथींमुळे सामान्य मतदार मात्र गोंधळून गेला आहे. कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे, याबाबत मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महापालिकेच्या 102 जागांसाठी निवडणूक

102 सदस्यीय सोलापूर महापालिकेसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 2017 मध्ये भाजपने 49 जागा जिंकत सर्वाधिक यश मिळवले होते. त्यानंतर शिवसेनेला 21, काँग्रेसला 11, एमआयएमला 9, राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 4, बसपला 4 आणि माकपला 1 जागा मिळाली होती. त्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. यंदाच्या निवडणुकीत मात्र स्थानिक समीकरणे, पक्षांतर्गत बंडखोरी, ऐनवेळी होणारे पक्षांतर आणि मतदारांचा बदलता कल यामुळे निवडणूक अधिकच चुरशीची झाली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या भाजप प्रवेशामुळे अजित पवार गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, सोलापूर महापालिकेचा निकाल नेमका कुणाच्या बाजूने झुकणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

मृदंग महर्षी आण्णाबुवा यादव यांच्या स्मरणार्थ १०८ मृदंग वादकांचा भव्य वादन सोहळा संपन्न

Next Post

समृद्धी करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुंबईचा यश पाटील विजेता तर महाडचा अमोल गोळे द्वितीय …सुहास आदमाने व डॉ. ऋचा गोडगे समृद्धी युवा पुरस्काराने सन्मानीत

Related Posts

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
Next Post
समृद्धी करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुंबईचा यश पाटील विजेता तर महाडचा अमोल गोळे द्वितीय …सुहास आदमाने व डॉ. ऋचा गोडगे समृद्धी युवा पुरस्काराने सन्मानीत

समृद्धी करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुंबईचा यश पाटील विजेता तर महाडचा अमोल गोळे द्वितीय ...सुहास आदमाने व डॉ. ऋचा गोडगे समृद्धी युवा पुरस्काराने सन्मानीत

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026