ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेत पालखीत विराजमान करण्यासाठी उत्सव मुर्ती व पादुका आज रोजी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिरातुन विधिवत पुजन करून उत्तर कसबा येथील थोबडे वाड्यात आणण्यात आले.

उद्या यात्रेतील पहिला दिवस यण्णीमज्जन दिवशी सकाळी थोबडे वाड्यातुन उत्सवमुर्ती व पादुका या पालखीत विराजमान केले जातात व मिरवणुकीने ६८ लिंग प्रदिक्षणेसाठी निघत असतात गेली. कित्येक वर्ष ही परंपंरा थोबडे घराण्याकडे असल्याची माहिती मानकरी संजय थोबडे यांनी प्रसिध्दीमाध्यमांसमोर दिली.
सदर प्रसंगी मानकरी सिध्देश थोबडे,संकेत थोबडे,मंजुनाथ हब्बु,प्रतिक थोबडे,प्रथमेश थोबडे,निखिल थोबडे,अक्षय वानकर,रोहन महिंद्रकर,ओंकार स्वामी यांची उपस्थिती होती…

