• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक अंतिम टप्प्यात

Yes News Marathi by Yes News Marathi
January 11, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक अंतिम टप्प्यात
0
SHARES
1
VIEWS

मतदान यंत्र वितरण, स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्रांची आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी…

सोलापूर — सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अंतिम टप्प्यात पोहोचली असून, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व सुरक्षितरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी शहरातील मतदान यंत्र वितरण केंद्र, स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणांना भेट देऊन सखोल पाहणी केली.यावेळी आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी मतदान यंत्रांचे वितरण ऑन-कॅमेरा पद्धतीने व कडक पोलीस बंदोबस्तात होत आहे की नाही, याची तपासणी केली. तसेच स्ट्रॉंग रूममधील सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही निगराणी, प्रवेश-निर्गमन नियंत्रण, सीलिंग प्रक्रिया व २४ तास पहारा याबाबत सविस्तर माहिती घेतली. मतमोजणी केंद्रांवरील बैठक व्यवस्था, विद्युत पुरवठा, अग्निसुरक्षा, सीसीटीव्ही यंत्रणा, कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्ती तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचीही त्यांनी पाहणी केली.पाहणीदरम्यान आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देत सांगितले की, निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा अत्यंत दक्षतेने, नियमानुसार व पारदर्शक पद्धतीने पार पाडला जावा. मतदारांचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा चालणार नसून, सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.तसेच मतदान यंत्र वितरण, साठवणूक व मतमोजणीदरम्यान सुरक्षा व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, आणि भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे, असेही त्यांनी नमूद केले.या पाहणीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी सदाशिव पडदुणे, निवडणूक निर्णय अधिकारी अंजिल मुरुड, निवडणूक निर्णय अधिकारी भैरप्पा माळी, नगर अभियंता सारिका आकूलवार,नियंत्रण अधिकारी तपन डंके, निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकारी, महापालिकेचे संबंधित विभागप्रमुख, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक शांततेत, निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी व्यक्त केला.

Previous Post

ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांची उत्सवमुर्ती पादुका थोबडे वाड्यात थोबडे परिवाराकडुन विधिवत पुजन

Next Post

पोस्को प्रकरणी नवऱ्याला उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन

Related Posts

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
Next Post
पोस्को प्रकरणी नवऱ्याला उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन

पोस्को प्रकरणी नवऱ्याला उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026