सोलापूर: नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा), सोलापूर शाखा आणि एसीएस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी “एसीएस निमाकॉन २०२५” या भव्य राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेचे उद्घाटन महालक्ष्मी बँक्वेट्स, सोलापूर येथे निमाचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आले . यावेळी व्यासपीठावर एसीएस हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ.राहुल कारीमुंगी, डॉ. प्रमोद पवार, ,डॉ. दीपक गायकवाड- पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून निमा केंद्रीय शाखेचे डॉ. शांतीलाल शर्मा, डॉ. विनायक टेंभुर्णीकर, डॉ. गजानन पडघन, डॉ .सायबू गायकवाड, डॉ.शैलेश निकम, डॉ. वैशाली पडघन, राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. राजू ताटेवार, डॉ साधना कुलकर्णी, डॉ. मृण्मयी मासोदकर, डॉ. पल्लवी माने, डॉ. प्रशांत देशमुख , डॉ. तुषार सूर्यवंशी , डॉ. अभय लुणावत डॉ. रविराज गायकवाड, डॉ. अनुश्री मुंढेवाडी, डॉ. राजश्री मठ उपस्थित होते.
समाजातील रुग्णांना उच्च प्रतीची वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील नवीन संशोधन व तंत्रज्ञान आणि प्रगत उपचार पद्धतींची माहिती इंटिग्रेटेड प्रॅक्टिशनर्स डॉक्टरांना मिळावी असा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे असे निमाचे माजी केंद्रीय अध्यक्ष सोलापूरचे डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर यांनी सांगितले.
उद्घाटन सोहळा दरम्यान निमा वुमन फोरम यांनी बनविलेल्या निमा डायरीचे व सोलापूर शाखेच्या सोविनियरचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
हृदयरोग तज्ञ डॉ. राहुल कारीमुंगी डॉ. प्रमोद पवार डॉ.दीपक गायकवाड पाटील यांनी हृदय रुग्णांना आधुनिक एआय आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून अवघड हृदय शस्त्रक्रिया व हृदयरोग उपचारातील नवीन उपकरणे यांचे प्रात्यक्षिक उपस्थित डॉक्टरांसमोर सादर केले.
डॉ. सुनील हिलालपुरे यांनी रक्ता संदर्भातील कॅन्सर , रक्तक्षय इ आजाराचे योग्य वेळेत निदान व उपचाराची माहिती उपस्थित डॉक्टरांना दिली. डॉ. मीनल चिडगुकर यांनी स्त्रियांना होणाऱ्या विविध आजार आणि वंध्यत्व सारख्या आजारांवर आजारांवर एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून निदान आणि उपचार बद्दल माहिती दिली.डॉ. रणजीत कदम यांनी मेंदूला आघात झालेल्या रुग्णांचे निदान आणि उपचार यामध्ये होणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि गोल्डन अवर मध्ये मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यावर रुग्णांना कसे वाचवायचे याबद्दल माहिती दिली.डॉ.प्रशांत धोंड यांनी उलटी जुलाब होऊन बीपी कमी झालेल्या रुग्णांना तात्काळ उपचार दिल्यास त्यांचे प्राण आपण कसे वाचवू शकतो याची माहिती उपस्थित डॉक्टरांना दिली.डॉ. सपळे( त्वचारोग तज्ञ ) यांनी सध्या सामान्य नागरिकांना भेडसावत असणाऱ्या त्वचेच्या फंगल इन्फेक्शन संदर्भात योग्य औषधोपचार योग्य वेळेपर्यंत कसा करायचा याची माहिती डॉक्टरांना दिली.डॉ. विनोद बन यांनी "खोकला" या एका लक्षणाला धरून आणि त्या संदर्भातील आजारांमुळे एखाद्या रुग्णाच्या जीवनात काय काय घडू शकते आणि डॉक्टर त्याचे निदान करून कशाप्रकारे उपचार करू शकतात याबद्दल सविस्तर माहिती दिली.लिव्हर विकार तज्ञ डॉ. सुजित जहागीरदार यांनी लिव्हरच्या आजारा संदर्भात सोलापूर मध्ये असलेल्या विविध उपचाराच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली आणि लिव्हर खराब झालेल्या रुग्णांना वाचवून त्यांचे राहणीमान कशा पद्धतीने आनंददायी करू शकतो याबद्दल मार्गदर्शन केले.
तसेच डॉ. प्रफुल्ल कल्याणकर यांनी डॉक्टरांना आर्थिक गोष्टींचे नियोजन काटेकोरपणे कसे करायचे आणि त्यायोगे कमी पैशांमध्ये रुग्णांची उच्च प्रतीची सेवा कसे करायचे याची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ” ACS निमाकॉन २५ “चे डॉ. सुभाष भांगे, डॉ.अमोल माळगे, डॉ . आसिफ शेख, डॉ.अभिजित पुजारी, डॉ. नितीन बलदवा, डॉ. नागनाथ जिड्डीमनी, डॉ.प्रवीण ननवरे, डॉ.श्रुती मराठे डॉ. अश्विनी देगावकर डॉ. पल्लवी भांगे , डॉ. समर्थ वाले, डॉ .आयाचित डॉ.उत्कर्ष वैद्य यांनी परिश्रम घेतले.



