महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील उपनेते, माजी आमदार शहाजी पाटील व पक्षाच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांना या स्टार प्रचारकांची धडाडणारी तोफ ऐकायला मिळणार आहे.

