• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राष्ट्रीय युवक दिनानिमित्त सोलापुरात समृद्धी करंडक राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन..

by Yes News Marathi
December 25, 2025
in इतर घडामोडी
0
राष्ट्रीय युवक दिनानिमित्त सोलापुरात समृद्धी करंडक राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन..
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर- संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे थोर साहित्यिक प्र. के. अत्रे यांच्या प्रेरणेतून राष्ट्रीय युवक दिन आणि राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून समृद्धी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, सोलापूर अंतर्गत समृद्धी कला मंच यांच्या वतीने ११ जानेवारी, २०२६ रोजी दुपारी २:३० वाजता राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे करण्यात आले आहे, समृद्धी कला मंच कडून राज्यभरात वक्त्यांसाठी सुवर्ण संधी निर्माण करून दिलेली आहे. असे समृध्दी कला मंचचे प्रमुख कार्यवाह मा. संजय सावंत यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

या स्पर्धेतून तरुणाईला सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी व सोलापूरच्या विकासा संदर्भात महत्वपूर्ण प्रश्नांवर आपले विचार प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेसाठी प्राथमिक फेरीचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले असून अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांना प्रत्यक्ष मंचावर सादरीकरण करण्याची संधी दिली जाणार आहे. प्राथमिक फेरीसाठी २५१ रुपये प्रवेश फी असून अंतिम फेरीसाठी पाचशे एक रुपये फी आहे.

आकर्षक पारितोषिके :
1)प्रथम क्रमांक:-15 हजार रुपये रोख रक्कम, समृद्धी करंडक व प्रमाणपत्र
2)द्वितीय क्रमांक:- 11 हजार रुपये रोख रक्कम, समृद्धी करंडक व प्रमाणपत्र
3) तृतीय क्रमांक:-7 हजार रुपये रोख रक्कम, समृद्धी करंडक व प्रमाणपत्र
4) उत्तेजनार्थ पारितोषिक प्रथम क्रमांक:- 5 हजार रुपये व प्रमाणपत्र
5) उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक:- 3 हजार रुपये व प्रमाणपत्र
दिले जाणार आहे.

स्पर्धेतील विषय :
1) चला जगुया आनंदाने
2) राष्ट्र निर्मितीत युवकांची भूमिका 3) समाजातील नीतीमूल्यांचा ऱ्हास 4) प्राथमिक शिक्षणातील समस्या व उपाय
5) संत साहित्याचे योगदान
6) कृत्रिम बुद्धिमत्ता: संधी व आव्हाने 7) सोत। पूर जिल्ह्याच्या विकासाची दिशा आणि दशा
8) सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या व उपाय
9) सोलापुरातील नारीशक्तीचा प्रवास काल, आज व उद्या”
या विषयांचा समावेश आहे.

डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सिद्धेश्वर मंदिर शेजारी सोलापूर येथे दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी दुपारी २:३० वाजता राज्यस्तरी वक्तृत्व स्पर्धेच्या अंतिम फेरीस प्रत्यक्ष सादरीकरणास प्रारंभ होईल. स्पर्धेनंतर 7:30 पारीतोषिक वितरण समारंभ होईल.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिवाजी शिंदे, सहाय्यक कुलसचिव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर, प्रा. अशोक निंबर्गी, संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष राजन सावंत हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थिती समृध्दी सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. संजय सावंत, समृध्दी कला मंचचे अध्यक्ष मा. कृष्णकांत चव्हाण, इंग्लिश स्कूल बेगमपूरचे माजी प्राचार्य मा. रामचंद्र दत्तू, समृद्धी सोशल फाउंडेशन चे संचालक मा. चंद्रकांत होळकर, समृद्धी कला मंचचे उपाध्यक्ष मा. सुमित फुलमाडी, सोलापूर विद्यापिठाचे सिनेट सदस्य मा. अजित संगवे, साहित्य रसिक मा. फैज अहमद बेगमपुरे, माजी प्राचार्य मा. राजू प्याटी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सहभागाचे आवाहन
राज्यातील सर्व ज्यु. कॉलेज, महाविद्यालये व इतर संस्थेतील जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन समृध्दी कला मंचचे अध्यक्ष कृष्णकांत चव्हाण व प्रमुख कार्यवाह संजय सावंत यांनी केले आहे.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धाप्रमुख मल्हारी बनसोडे, मल्लिनाथ निंबर्गी,किरण लोंढे इ मान्यवर काम करणार आहेत. तसेच आयोजन समितीतील रमेश बसाटे, गोवर्धन कमटम, प्रशांत बडवे, बसवराज मठपती, हिरालाल धुळम, पुंडलिक कलखांबकर, श्रीमंत कोळी, डॉ. माधुरी भोसले, अमोलिका जाधव, रेणुका बुधाराम, जितेंद्र कुलकर्णी, संतोष शिरसट, अरविंद मोटे, अनिल खरटमल, मल्लिकार्जुन सोमेश्वर, अर्चना कलखांबकर, शुभांगी पवार, विद्या वरडुळे, शिल्पा बहिजे, बालाजी चव्हाण, राजकुमार कोळी इ काम पाहात आहेत.

नोंदणीसाठी संपर्क –
डॉ. माधुरी भोसले ८७८८५१८३५५ ,अमोलिका जाधव ९५११६२८८५१
प्राथमिक फेरीसाठी संपर्क
किरण लोंढे ९०११२७९११२
श्रीमंत कोळी ९४२०७८०४२१

Previous Post

परमेश्वर सुरवसे यांची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड.

Next Post

प्लिंथ इंटीमेशन न देता बांधकाम सुरू ठेवल्यास महापालिका कारवाई करणार

Next Post
प्लिंथ इंटीमेशन न देता बांधकाम सुरू ठेवल्यास महापालिका कारवाई करणार

प्लिंथ इंटीमेशन न देता बांधकाम सुरू ठेवल्यास महापालिका कारवाई करणार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In