महिला अत्याचार प्रकरणी वादग्रस्त ठरलेले माजी महापौर मनोहर सपाटे यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.सपाटे यांच्यावरील या आरोपाने पक्षाची बदनामी होईल म्हणून राष्ट्रवादी पक्षातून त्यांचे निलंबन करण्यात आले होते. पोलिसांकडून आता कोणतीही चौकशी शिल्लक राहिलेली नाही त्यामुळे निलंबन कारवाई मागे घ्यावी, अशी विनंती सपाटे यांनी पक्षाकडे केली होती. पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी त्यांचे निलंबन मागे घेत असल्याचे स्पष्ट केले व तसे पत्रही काढले.


