• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बसव ब्रिगेडच्या बसवरत्न पुरस्कारांची घोषणा..

Yes News Marathi by Yes News Marathi
December 18, 2025
in इतर घडामोडी
0
बसव ब्रिगेडच्या बसवरत्न पुरस्कारांची घोषणा..
0
SHARES
2
VIEWS

कर्नाटकचे उद्योग मंत्री एम.बी पाटील यांच्या हस्ते होणार वितरण..

जोल्ले दांपत्याला राज्यस्तरीय शरण दंपती पुरस्कार, जीवन गौरवसह ८ पुरस्कार..

सोलापूर : जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त बसव ब्रिगेड सोलापूर शहर व जिल्हातर्फे देण्यात येणाऱ्या बसवरत्न पुरस्कार २०२५ ची घोषणा बसव ब्रिगेडचे शहर जिल्हाध्यक्ष अमित रोडगे यांनी पत्रकार परिषदेत केली.

रविवारी दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जुळे सोलापुरातील जामगोंडी लॉन्स येथे कर्नाटकचे वाणिज्य व उद्योग पायाभूत सुविधा मंत्री एम. बी. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर राहणार आहेत. तर विशेष पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेत्या अंजली आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून खा. प्रणिती शिंदे, ज्येष्ठ समाजसेवक  श्रीशैल हत्तुरे, माजी आ. दिलीप माने उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील, माजी नगरसेवक किरण देशमुख, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, खलील शेख, सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाऊसाहेब सगरे, संतोष वायचळ, श्रीशैल रणधिरे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती राहणार आहे, असे बसव ब्रिगेडचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष अमित रोडगे यांनी सांगितले.

पुरस्काराचे यंदा चौथे वर्ष आहे.   फेटा, सन्मानचिन्ह, शाल  असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील बसवभक्तांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हाध्यक्ष अमित रोडगे यांनी केले. या पत्रकार परिषदेस कार्याध्यक्ष बसवराज चाकाई, दक्षिण तालुका अध्यक्ष जतिन निमगाव, शहर सहसचिव अविनाश बिराजदार, भरत कुरणे, जुळे सोलापूर समन्वयक अमरनाथ दामा आदी उपस्थित होते.

हे आहेत पुरस्काराचे मानकरी

यावेळी अण्णासाहेब जोल्ले आणि शशिकला जोल्ले यांना राज्यस्तरीय शरण दंपती पुरस्कार देण्यात येणार आहे. बसवराज तंबाके यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार असून लिंगायत अभ्यासक चन्नवीर भद्रेश्वरमठ, सामाजिक कार्यकर्ते राजशेखर बुरकुले, महिला प्रबोधन करणारे राहुल बिराजदार, अंतराळ विषयक संशोधन करणाऱ्या बिल्वा गिराम, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बाकळे, श्याम धुरी, रमेश वायचळ यांना बसवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच बसव सर्कलसाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल मनीष काळजे, आणि अक्षय अंजिखाने यांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात येणार आहे.

Previous Post

शिल्पातून घडलेले राष्ट्रपुरुष – महान शिल्पकार राम सुतार

Next Post

मंगळवारपासून भरता येणार महापालिका निवडणुकीचे अर्ज… तिकिटांचा घोळ.. उमेदवार टेन्शनमध्ये

Related Posts

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
Next Post
मंगळवारपासून भरता येणार महापालिका निवडणुकीचे अर्ज… तिकिटांचा घोळ.. उमेदवार टेन्शनमध्ये

मंगळवारपासून भरता येणार महापालिका निवडणुकीचे अर्ज... तिकिटांचा घोळ.. उमेदवार टेन्शनमध्ये

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026