• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी नॉर्थकोर्ट प्रशाला येथे केली पाहणी

by Yes News Marathi
December 17, 2025
in इतर घडामोडी
0
आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी नॉर्थकोर्ट प्रशाला येथे केली पाहणी
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 पारदर्शक, सुरक्षित व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी महानगरपालिकेकडून निवडणूक तयारीला वेग आला असून, आज आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी शहरातील नॉर्थ कोर्ट प्रशाला येथे उभारण्यात येणाऱ्या विविध निवडणूक कार्यालयांची सखोल पाहणी केली.

या पाहणीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी १ ते ८ यांच्या कार्यालयांची प्रत्यक्ष तपासणी करताना योग्य जागेची निवड, वीजपुरवठा, बैठक व्यवस्था, महत्त्वाचे दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष, आयटी सुविधा, सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेचा आयुक्तांनी बारकाईने आढावा घेतला. निर्णय अधिकाऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.सीसीटीव्ही कव्हरेज,पोलिस बंदोबस्त, नियंत्रण कक्ष, प्रवेश व निर्गम मार्ग, अग्निशमन उपकरणे तसेच २४ तास सुरक्षा व्यवस्थेची सखोल तपासणी करण्यात आली. सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट करत आयुक्तांनी आवश्यक निर्देश दिले.

तसेच उमेदवार प्रतिनिधींसाठी स्वतंत्र जागा, मीडिया गॅलरी, आयटी कक्ष, प्रिंटर, वाय-फाय सुविधा, आपत्कालीन व्यवस्था, पार्किंग आदी बाबींचेही नियोजन तपासण्यात आले. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी व्यवस्थापन अधिक काटेकोर करण्याच्या सूचना डॉ. ओम्बासे यांनी दिल्या.

नॉर्थ कोर्ट प्रशाला परिसरात मार्गदर्शक फलक, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रकाश व्यवस्था, जनरेटर व इंटरनेट सुविधांचा देखील सविस्तर आढावा घेण्यात आला.

या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त गिरीष पंडित, नगर अभियंता सारिका आकूलवार, ओमप्रकाश वाघमारे, प्रदीप निकते, संदीप भोसले, कामगार कल्याण अधिकारी अजितकुमार खानसुळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून निवडणूक तयारी अधिक सक्षम करावी, असे निर्देश आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी यावेळी दिले.

Previous Post

जकराया शुगरकडून ऊसाला प्रतिटन ३ हजार रुपये दर जाहीर

Next Post

शिल्पातून घडलेले राष्ट्रपुरुष – महान शिल्पकार राम सुतार

Next Post
शिल्पातून घडलेले राष्ट्रपुरुष – महान शिल्पकार राम सुतार

शिल्पातून घडलेले राष्ट्रपुरुष – महान शिल्पकार राम सुतार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In