पीडित मुलीच्या वडिलांचे अपहरण
खून, मारामारी, बलात्कार यांनी पुरते बदनाम झालेल्या बीड शहरात पुन्हा एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.शहरातील सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात पीडितेच्या पालकांवर आरोपीच्या नातेवाईकांनी दबाव आणला असून केस मिटवण्यासाठी पैशाचे आमिष दाखवण्यात आले. मात्र वडिलांनी यास ठाम नकार देताच त्यांचे अपहरण करण्यात आले. या घटनेने राज्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.यासंदर्भात न्यायासाठी पीडितेच्या आईने विधी सेवा प्राधिकरणाकडे धाव घेऊन सचिवांकडे तक्रार केली आहे. आणि विशेष म्हणजे या तक्रारीत काही राजकीय नेत्यांच्या नावांचाही उल्लेख असल्याने ऐन हिवाळी अधिवेशनात वातावरण तापले आहे. 5 नोव्हेंबरला म्हाळसजवळा येथील सुरज खांडे या नराधमाने अकरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला होता.

