रशियाशी जवळीक वाढल्याने व भारत – पाक युद्धबंदीचे श्रेय न दिल्याने भारतावर अगोदरच नाराज असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरुद्ध गनिमी कावा करत पाकिस्तानला तब्बल सहा हजार दोनशे कोटी रुपयांची मदत केली आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हे दोन दिवसाच्या भारत भेटीवर होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची वाढलेली जवळीक व मैत्री पाहून डोनाल्ड ट्रम्प यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. अमेरिकेच्या इशाराला भीक न घालता भारताने रशियातून तेल खरेदी धोरण चालूच ठेवले होते. यामुळे ट्रम्प अगोदरच भारतावर नाराज होते. शिवाय भारत-पाक युद्धाचे युद्धबंदीचे श्रेय घेण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला, परंतु भारता सरकारकडून याबाबत अधिकृत वक्तव्य जारी करण्यात न आल्याने त्यांची नाराजी उघडपणे दिसत होत. भारत भेटीतील पुतीन – मोदी यांचा याराना पाहून ते अधिकच चिडले आणि भारताच्या विरोधात नापाक चाल करत भारताचा पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानला ट्रम्प यांनी 686 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी भरघोस मदत केली.
पाकिस्तान या रकमेतून भारता विरूद्ध लढण्यासाठी 6, F16 लढाऊ विमानांची खरेदी करणार असून क्षतिग्रस्त विमानांची दुरुस्ती व देखभाल देखील याच पैशातून करणार आहे.

