मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेला पंढरपूरचा कॉरिडॉर आणि शक्तिपीठ महामार्ग यासंदर्भात जिल्हाधिकारी एस कार्तिकीयन यांनी महत्त्वाची माहिती दिली . पंढरपूर कॉरिडॉर मध्ये सुमारे साडेचारशे लोकांची घरे जाणार असून त्यांना एमटीडीसी च्या जागेवर घरे बांधून दिली जाणार आहेत. एमटीडीसीकडे 31 हजार 500 चौरस मीटर जागा असून ती विनामूल्य अजून जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. पंढरपूरच्या कॉरिडॉर होण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ऐतिहासिक पॅकेज दिले आहे. आता सल्लागाराची देखील नेमणूक झाली असून कामाला गती येईल असे जिल्हाधिकारी म्हणाले. सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाचा ड्रोन सर्वे पूर्ण झाला आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचे गैरसमज दूर करू जॉईंट मेजरमेंट सर्वे करू अशी माहिती जिल्हाधिकारी कार्तिकीयेन यांनी दिली.










