• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

Yes News Marathi by Yes News Marathi
August 29, 2026
in इतर घडामोडी
0
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
0
SHARES
12
VIEWS

सोलापूर, दि. २९- सोलापूर येथील विडी उद्योग व विडी कामगारांच्या किमान वेतनाच्या प्रश्नावर तातडीने संयुक्त बैठक आयोजित करून समन्वयाने तोडगा काढावा, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कामगार मंत्री अँड आकाश फुंडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोलापूरचा विडी उद्योग हा हजारो कामगारांच्या, विशेषतः महिला कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार असून सुमारे पन्नास हजार विडी कामगारांचा रोजगार या उद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे उद्योगासमोर निर्माण झालेली सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून शासनाने त्यात तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे.

सध्या विडी कामगारांच्या किमान वेतनाच्या प्रश्नावरून विडी कामगार, कामगार संघटना आणि विडी कारखानदार यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कामगारांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळावा आणि शासनाने निश्चित केलेल्या किमान वेतनाची अंमलबजावणी व्हावी, ही कामगारांची रास्त मागणी असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी नमूद केले आहे.

त्याचवेळी वाढीव मजुरी, मागील फरकाची रक्कम, उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि बाजारातील स्पर्धा यामुळे उद्योगावर मोठा आर्थिक भार पडत असल्याचे विडी कारखानदारांचे म्हणणे आहे. वाढीव खर्च परवडत नसल्याने विडी कारखानदारांनी १ सप्टेंबर २०२६ पासून कारखाने बेमुदत बंद करण्याची तसेच उद्योग तेलंगणा राज्यात स्थलांतरित करण्याची भूमिका घेतल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

सोलापूरमधील विडी उद्योग बंद पडल्यास किंवा स्थलांतरित झाल्यास हजारो कामगारांचा रोजगार धोक्यात येईल आणि त्यांच्या कुटुंबांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होईल. तसेच रोजगाराच्या संधी कमी झाल्यास इतर शहरांमध्ये व राज्यांमध्ये कामगारांचे स्थलांतर वाढण्याची शक्यता असल्याची चिंताही खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर विडी कारखानदारांचे प्रतिनिधी, विडी कामगार संघटनांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, कामगार विभागाचे अधिकारी आणि जिल्हा प्रशासन यांची तातडीने संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. या बैठकीत किमान वेतन, वाढीव मजुरीचा उद्योगावर होणारा आर्थिक परिणाम, कामगारांचा रोजगार आणि उद्योगाचे भवितव्य यांचा सर्वंकष विचार करून दोन्ही बाजूंना मान्य होईल असा न्याय्य, व्यवहार्य आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

सोलापूरचा विडी उद्योग हा केवळ व्यवसाय नसून हजारो कष्टकरी कामगार आणि त्यांच्या कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार असल्याचे सांगत, कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योग बंद पडू नयेत, उद्योगाचे स्थलांतर होऊ नये आणि हजारो कामगारांचा रोजगार सुरक्षित राहावा यासाठी शासनाने तातडीने पुढाकार घेऊन सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय साधावा, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

Previous Post

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

Next Post

मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’

Related Posts

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
Next Post
मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’

मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026