येस न्यूज मराठीचा खुमासदार आढावा
नागपूर येथे गुलाबी थंडीत राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून राजकीय नेत्यांच्या आरोप – प्रत्यारोपामुळे वातावरण भलतेच तापले आहे.या तापलेल्या वातावरणात काही हलकेफुलके चिमटे घेत वातावरण उबदार ठेवण्याचा प्रयत्न देखील काही नेत्यांकडून करण्यात आला.
लाडक्या बहिणीमुळे एक नंबर पदावरून दोन नंबर पदावर गेलात अशी उपरोधिक टीका जयंत पाटलांनी केली. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच लाडक्या बहिणींनी विरोधकांचा टांगा पलटी केला असे म्हणत आमच्या लाडक्या बहिणींना योग्य वेळी 2100 रुपये देऊ असे आश्वासन अधिवेशनात दिले.
आमदार शरद सोनवणे यांनी चक्क बिबट्याची वेषभूषा घालून अधिवेशनात प्रवेश केला.बिबट्याला जेेर बंद करण्यासाठी एक कोटींच्या शेळ्या जंगलात सोडण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. तर यावर रोहित पवार यांनी फक्त घोषणा करू नका प्रत्यक्ष कार्यवाही करा अशी मागणी केली.

