एरव्ही बोगदे पाण्याने तुंंबतात; मात्र शेटे वस्ती येथील रेल्वे बोगदा हा काल वाहनांच्या प्रचंड गर्दीने तुंबला गेला. मरीआई चौकातील रेल्वे उड्डाणपूल काल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने देगाव, दमानी नगर यांसह परिसरातील शेकडो वाहने शेटे वस्ती येथील दहा बाय दहाच्या रेल्वे बोगद्याच्या दिशेने वळली होती. वाहनांची भयानक गर्दी झाली असून वाहतुकीची भीषण परिस्थिती उद्भवली आहे.

