• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

शिवशक्ती प्राकृतिक चिकित्सालयात बोगस डॉक्टरांवर कारवाई..

by Yes News Marathi
December 3, 2025
in इतर घडामोडी
0
शिवशक्ती प्राकृतिक चिकित्सालयात बोगस डॉक्टरांवर कारवाई..
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गुन्हा दाखल होऊन देखील आरोग्य विभागाचा आणि पोलीस प्रशासनाचा संपूर्ण पाठिंबा असल्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ चालूच,

दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी येथे चालणाऱ्या शिवशक्ती प्राकृतिक चिकित्सालयावर आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांनी दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी धाड टाकली. या कारवाईदरम्यान डॉ. अर्चना मल्लिकार्जुन कुंभार या रुग्णांवर उपचार करताना प्रत्यक्ष आढळल्या. तसेच एस. एम. कुंभार या ठिकाणी उपस्थित माझे पाच लाख चोरीला गेले असे खोटे नाटे आरोप करत असताना आढळला, एक बीएएमएच पदवीधारक व्यक्तीही जो मी डॉक्टर आहे इथला असे सांगत असताना धाड सत्राच्या ठिकाणी आढळला, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करताच सोडण्यात आले. छाप्यात ओमिनी व्हॅनमध्ये ऍलोपॅथी औषधांची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचे पुरावे मिळाले. विविध ऍलोपॅथी औषधे, इंजेक्शन्स व साहित्य जप्त करण्यात आले.

डॉ. अर्चना कुंभार यांच्याकडे होमिओपॅथीची पदवी असताना, त्या बेकायदेशीरपणे ऍलोपॅथी औषधे देत असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर BNSS कलम 319 (2), 318 (4) आणि 336 (2) नुसार सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यापूर्वीही 26 ऑक्टोबर 2024 रोजी तालुका बोगस वैद्यकीय व्यवसाय शोध व कार्यवाही समितीने याच प्राकृतिक चिकित्सालयात तपासणी केली होती. त्या तपासणीत मल्लिकार्जुन भीमाशंकर कुंभार हे कोणत्याही वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक प्रमाणपत्रांशिवाय उपचार करत असल्याचे दिसून आले होते. तसेच अर्चना मल्लिकार्जुन कुंभार प्रत्यक्ष बोगस वैद्यकीय व्यवसाय करताना आढळल्या, तरीही फक्त मल्लिकार्जुन भीमाशंकर कुंभार यांच्यावरच कारवाई झाली.

तथापि, पूर्वीची कारवाई असूनही कोणताही परिणाम न झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण मल्लिकार्जुन कुंभार हे पुन्हा दवाखाना सुरू ठेवून बेकायदेशीरपणे उपचार करत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाला रोहित लालसरे यांच्याकडून सबळ पुराव्यानीशी मिळाली असताना,शिवशक्ती प्राकृतिक चिकित्सालय हे नावाने निसर्गोपचार देण्याचे ठिकाण असताना, येथे धोकादायक ऍलोपॅथी उपचार, तसेच कॅन्सर, एड्स, अर्धांगवायू यांसारख्या गंभीर आजारांवर उपचार होतात, अशा भ्रामक जाहिराती करून रुग्णांची फसवणूक सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्या दिवशी 28/11/2025 रोजी स्थळ पाहणी व पंचनाम्यासाठी पोलिसांना घेऊन समिती गेले असता त्या ठिकाणी वरील सर्व व्यक्ती व्यवसाय करताना आढळून आले त्या संदर्भात कॉल रेकॉर्डिंग ही आरोग्य अधिकारी सोबत चर्चा करतानाचा पुरावा.या प्रकारामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागाकडून या प्रकरणाची पुढील तपासणी सुरू आहे.

अर्जदाराची मागणी दोन्ही रेडमध्ये प्रत्यक्ष आढळलेल्या सर्व व्यवर्तीवर समान आणि पारदर्शक कारवाई करण्यात यावी.वारंवार चालणाऱ्या बोगस वैद्यकीय व्यवसायामुळे सदर दवाखाना / निसर्गोपचार चिकित्सालय तात्काळ सील करण्यात यावा. बेकायदेशीर विक्रीसाठी वापरलेली ओमिनी व्हॅनही जप्त करण्यात यावी, कारण ती गुन्ह्यात थेट वापरलेली वाहन आहे.

Previous Post

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळंतीणचा मृत्यू !

Next Post

सोलापुरचा डेव्हलपमेंट प्लॅन शासनाकडे न पाठविता आयुक्तांनी अडविला..!

Next Post
सोलापुरचा डेव्हलपमेंट प्लॅन शासनाकडे न पाठविता आयुक्तांनी अडविला..!

सोलापुरचा डेव्हलपमेंट प्लॅन शासनाकडे न पाठविता आयुक्तांनी अडविला..!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In