• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळंतीणचा मृत्यू !

by Yes News Marathi
December 3, 2025
in इतर घडामोडी
0
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळंतीणचा मृत्यू !
0
SHARES
55
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

डॉ. जयकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा..! नातेवाईकांची मागणी.

माझी मुलगी सुमैय्याबानो शाहरूख सय्यद, हीचे लग्न दि.१३/११/२०२४ रोजी झाले. त्यानंतर ती दोन महिन्यानंतर गरोदर झाली. गरोदर असल्याने त्याचा औषध उपचार निरामय क्लिनिक, लष्कर, सोलापूर येथे सुरू होता. त्यानंतर दि.२२/०९/२०२५ रोजी ती बाळंतीण झाली. तिला मुलगी झाली, परंतू सदरची डिलिव्हरी हे सिजर द्वारे करण्यात आले. सिजरच्या वेळी डॉ. नितू जयकर यांनी चुकीच्या पध्दतीने उपचार केल्याने माझी मुलगी सुमैय्या सय्यद हीच्या शरीरामध्ये इंफेक्शन होऊन दोन्ही किडन्या निकामी झाल्या. सदरची बाब ही डॉक्टर यांनी आम्हाला कळिवले त्यावेळी आम्ही त्यांना मॅडम तुमच्या हलगर्जीपणामुळे माझ्या मुलीला इंफेक्शन होऊन किडणी फेल झाली असे सांगितले असता डॉ. नितू जयकर यांनी आम्हाला खोटे आवश्वासन देऊन तुमची मुलगी बरी होईल असे सांगितल्याने आम्ही त्यांच्या आवश्वासनाला बळी पडून त्यांचे ऐकत गेलो. नितू जयकर यांनी हॉस्पिटलचे रू.३०,०००/- बिल आमच्याकडून घेतले आणि रू.१५,०००/- चे औषध लिहून दिले. परंतू माझ्या मुलीची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चालली होती. त्यावेळी डॉ. नितू जयकर घाबरून जाऊन आम्हाला सिव्हील हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. तसेच डॉ. नितू यांचे पती ऋतीक जयकर हे सिव्हील हॉस्पिटलमध्ये डीन आहे असे सांगून उपचारासाठी पाठवून दिले.

त्यानंतर आम्ही दि.२३/०९/२०२५ रोजी सिव्हील हॉस्पिटल, सोलापूर येथे डॉ. नितू जयकर यांच्या सांगण्यावरून माझ्या मुलीला सिव्हील हॉस्पिटल मध्ये दाखल केले. माझ्या मुलीची प्रकृती खालवत चालली होती त्यामुळे सिव्हील हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की, इंफेक्शन खुप वाढल्यामुळे बायस्पी टेस्ट करावी लागेल त्यांनी सिव्हील हॉस्पिटल येथे सदरची टेस्ट उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला बाहेरून टेस्ट करण्यास सांगितल्याने आम्ही खासगी हॉस्पिटल डॉ. कतरे यांच्याकडे सदरची टेस्ट दि.१२/१०/२०२५ रोजी रु.२५,०००/- भरून करून घेतले. त्यानंतर रिपोर्ट मध्ये चुकीच्या उपचार पध्दतीमुळे संपूर्ण शरीरामध्ये इंफेक्शन होऊन दोन्ही किडनी व इतर अव्यय निकामी होत चालले आहे असे दिसून आले.

त्यानंतर आम्ही परत दि. १९/१०/२०२५ रोजी सिव्हील हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले असता माझी मुलगी मृत्यूशी झुंज देत दि.२२/१०/२०२५ रोजी मयत झाली.

माझी मुलगी चांगल्या अवस्थेमध्ये डिलिव्हरीसाठी डॉ. नितू जयकर, निरामय क्लिनिक यांच्याकडे दाखल झाली असताना केवळ डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे माझ्या मुलीला पूर्ण शरीरामध्ये इंफेक्शन होऊन दोन्ही किडनी निकामी होऊन तिचे निधन झाले. याला फक्त आणि फक्त डॉ. नितू जयकर याच जबाबदार आहेत. तसेच त्यांचे पती सिव्हील हॉस्पिटल मध्ये डीन असल्याने रिपोर्टमध्ये हेराफेरी करून माझ्या मुलीचा जिव घेतला आहे आणि प्रकरण दडपून टाकून स्वतःची सुटका करू पाहत आहेत.. याला हे केवळ पती पत्नी जबाबदार असून सदर दोघांवरती मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होऊन आम्हाला न्याय मिळावा, ही नम्र विनंती.

दरम्यान आम्ही दिनांक ३१/१०/२०२५ रोजी संबंधित व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. यासाठी पोलीस आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. म्हणून आम्ही आमच्या मुलीला न्याय मिळण्यासाठी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृह राज्यमंत्री आणि मेडिकल कौन्सिलकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून लवकरात लवकर संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा मी माझ्या नातेवाईकांसह आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे.

Previous Post

सोलापूर – अनकापल्ली रेल्वे गाडी धावतच राहणार..

Next Post

शिवशक्ती प्राकृतिक चिकित्सालयात बोगस डॉक्टरांवर कारवाई..

Next Post
शिवशक्ती प्राकृतिक चिकित्सालयात बोगस डॉक्टरांवर कारवाई..

शिवशक्ती प्राकृतिक चिकित्सालयात बोगस डॉक्टरांवर कारवाई..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In