• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कर्जमाफी महत्त्वाचीच, पण ते अंतिम उत्तर नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Yes News Marathi by Yes News Marathi
November 17, 2025
in मुख्य बातमी
0
कर्जमाफी महत्त्वाचीच, पण ते अंतिम उत्तर नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
0
SHARES
0
VIEWS

मुंबई – शेतकऱ्यांच्या कर्ज माफीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. अलीकडच्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात झालेले शेतीचे नुकसान, त्यावरचे भरपाईचे पॅकेज आणि कर्जमाफीची मागणी, या सर्वांवर विरोधक सरकारला घेरत असतानाच फडणवीस यांनी कर्जमाफी महत्त्वाचीच आहे, पण कर्जमाफी हे अंतिम उत्तर नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे सरकारची भूमिका नेमकी काय? असा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे.

मराठवाड्यात मागील काही दिवसांत अतिवृष्टी झाली आणि अनेक भागामध्ये शेतजमिनी, पिके, गुरेढोरे वाहून गेली. या अनपेक्षित आपत्तीमुळे हजारो शेतकरी अडचणीत सापडले. राज्य सरकारने नुकसानभरपाईसाठी पॅकेज जाहीर केले असले तरी ते अत्यल्प असून शेतकऱ्यांच्या दु:खाला न्याय देणारे नाही, अशी टीका विरोधकांनी केली. उद्धव ठाकरे स्वतः मराठवाड्यात दौऱ्यावर गेले होते आणि त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी राज्य सरकारची पहिल्या टप्प्यातील मदत प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का, याचा आढावा घेत सरकारवर तीव्र टीका केली. तसेच आमच्या सरकारने सर्वसमावेशक कर्जमाफी केली होती, याच धर्तीवर या सरकारनेही तत्काळ कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली.

याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना कर्जमाफीबाबत मोठे विधान केले. ते म्हणाले की, कर्जमाफी नक्कीच महत्त्वाची आहे. आम्ही ती महत्त्वाचीच मानतो. पण कर्जमाफी हे शेती समस्येचं अंतिम उत्तर नाही. यामुळे तात्पुरता दिलासा मिळतो, पण भविष्यातील संकट टळत नाही. फडणवीस पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मिशननुसार राज्यातील 25 हजार हेक्टर शेती नैसर्गिक शेतीकडे वळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी बियाणे कंपन्यांना आवश्यक ते मार्गदर्शन देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

शेती शाश्वत झाली पाहिजे – फडणवीस

कर्जमाफीच्या चर्चेपलीकडे जाऊन फडणवीस यांनी शेतीमधील शाश्वततेवर भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, अंतिम उपाय म्हणजे शेतीमध्ये शाश्वतता आणणे. उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे, उत्पादकता वाढली पाहिजे, तेव्हाच शेतकऱ्यांची खरी प्रगती होईल. त्यांनी सांगितले की शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट प्रकल्प आणि आधुनिक पद्धतींचा वापर हा काळाचा गरज असून याच माध्यमातून शेती नफ्यात आणता येईल. मराठवाड्यातील नुकसानीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा मुद्दा विशेषत्वाने मांडला. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी त्यांना विनम्र अभिवादनही केले.

Previous Post

नाशिकमधील भोसला स्कूल परिसरात बिबट्या शिरल्याची खबर…

Next Post

शेतकऱ्यांचा लोकमंगलला तर पोलिसांचा ऊस वाहतूकदारांना इशारा…

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
शेतकऱ्यांचा लोकमंगलला तर पोलिसांचा ऊस वाहतूकदारांना इशारा…

शेतकऱ्यांचा लोकमंगलला तर पोलिसांचा ऊस वाहतूकदारांना इशारा…

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026