मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक आज संपन्न झाली. आजच्या बैठकीत 21 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये, सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत विविध प्रकारच्या 2400 आजारांसाठी मान्यता देण्यात आली असून 2399 आजारांसाठी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार होणार आहेत. तर, ज्या काही गंभीर आजारांसाठी अधिकचा खर्च होत आहे, त्यात 10 लाख रुपये देण्याचा निर्णयही शासनाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

