• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शौर्य दिनानिमित्त वीर जवानांच्या कुटुंबांचा सन्मान

Yes News Marathi by Yes News Marathi
September 29, 2020
in मुख्य बातमी
0
शौर्य दिनानिमित्त वीर जवानांच्या कुटुंबांचा सन्मान
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि.29 : सीमेवर शौर्याच्या जोरावर शत्रूला नामोहरण करून आपले रक्षण करतात. वीर जवानांनी देश सेवेसाठी आपले योगदान आणि बलिदान दिलेले आहे. त्यांच्या कुटुंबियांना शासनस्तरावर सर्वतोपरी मदत करण्यात येत असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अजित देशमुख यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. देशमुख बोलत होते. यावेळी सहायक पोलीस आयुक्त महावीर सकळे, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह वीर माता-पिता, वीर पत्नी आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

2016 मध्ये जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर आतंकवादी हमला झाला होता. या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर आणि शत्रूला धडा शिकविण्यासाठी भारतीय पॅरा कमांडोंनी 28 आणि 29 सप्टेंबर 2016 मध्ये पाकिस्तान हद्दीत घुसून एअर स्ट्राईक करीत आतंकवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले होते. आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा सन्मान म्हणून 29 सप्टेंबरला शौर्य दिन साजरा केला जात आहे.

शहिदांना बिगुल धून वाजवून श्रद्धांजली वाहण्यात आली.

देशमुख म्हणाले, वीर जवानांच्या पत्नींनी पुढची पिढी घडविण्यासाठी काम करावे. शिक्षणानुसार त्यांना नोकरीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. वीर माता-पिता, पत्नी या आमच्यासाठी मौल्यवान आहेत. सध्या कोरोना काळात प्रत्येकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्कचा वापर, हात साबणाने स्वच्छ धुणे हे काटेकोरपणे करा. ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या शासनाच्या मोहिमेंतर्गत आरोग्य पथक घरी येईल, त्यांना आरोग्याची खरी माहिती द्या. आजार त्वरित समजला तर उपचाराने कोरोनावर मात करता येते.

यावेळी सर्वांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तोडगा काढणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले. वीर पिता मुन्नागीर गोसावी, वीरपत्नी अर्चना सुनील काळे, पपिता पात्रे, वर्षा लटके, इंदू गवळी, मालनबाई जगताप, अलका कांबळे, साजिया शेख, सुनिता शिंदे या वीर जवानांच्या कुटुंबांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच सेना मेडल कॅप्टन रावसाहेब साळुंखे, सुभेदार मेजर आर.के. उतारे, कॅप्टन दत्ता केदार यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील वरिष्ठ लिपीक अनिल मेंगशेट्टी, कल्याण संघटक मार्तंड दाभाडे, संजीव काशिद, लिपीक दिनेश नागणे, गुरुनाथ कुलकर्णी, समीर आरकाटे, वसतीगृह अधीक्षक सतीश रासकर, आशादेवी किवडे, एम.यु. मुल्ला, राजेसाहेब शेख, मारूती शेवडे आदी उपस्थित होते

Previous Post

विद्यापीठाच्या आंदोलनास सोलापूर कॉलेज कर्मचारी युनियनचा पाठिंबा

Next Post

आसीम रियाझ आणि सेहनूर चे म्युझिक विडिओ “बदन पे सितारे २.०” झाले रिलीझ

Related Posts

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
Next Post
आसीम रियाझ आणि सेहनूर चे म्युझिक विडिओ “बदन पे सितारे २.०” झाले रिलीझ

आसीम रियाझ आणि सेहनूर चे म्युझिक विडिओ "बदन पे सितारे २.०" झाले रिलीझ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026