• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

IIT मध्ये सोलापूरच्या बहिणींनी घडवला ऐतिहासिक विक्रम

Yes News Marathi by Yes News Marathi
June 18, 2025
in इतर घडामोडी, मुख्य बातमी
0
IIT मध्ये सोलापूरच्या बहिणींनी घडवला ऐतिहासिक विक्रम
0
SHARES
3
VIEWS

IIT CEED 2025 परीक्षा, जी देशातील 10 IIT संस्थांमध्ये 2 वर्षाच्या मास्टर ऑफ डिझाईन (M. Des) अभ्यासक्रमासाठी घेतली जाते, सोलापूरच्या ऋतु धर्मेश टांक हिला ओपन श्रेणीत अखिल भारतीय 195वा क्रमांक मिळाला, त्या आधारे तिला प्रतिष्ठित IIT गुवाहाटीमध्ये मुलाखत व लेखी चाचणीसाठी बोलावण्यात आले आणि त्यानंतर तिची अंतिम निवड झाली.

IIT गुवाहाटीमधील Department of Design (DoD) ही संस्था देशातील सर्वोतम तांत्रिक बुध्दीमतांमध्ये नवकल्पनांची प्रेरणा निर्माण करण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आलेल्या अकरा प्रमुख विभागांपैकी एक आहे. येथे M.Des अभ्यासक्रम राबविला जातो, जो प्रॉडक्ट डिझाईन, इंटरॅक्शन डिझाईन, कम्युनिकेशन डिझाईन यांसारख्या विविध शाखांमध्ये विशेष ज्ञान देतो.

ऋतुने याआधी श्रीष्टि मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, बेंगळुरू येथून Information Design मध्ये पदवी घेतली असून ती ParallelHQ, बंगळुरु या डिझाईन कन्सल्टन्सी फर्ममध्ये Associate Product Designer म्हणून कार्यरत आहे.

या यशाचे वैशिष्ट्य म्हणजे ऋतुची मोठी बहीण प्राची हिनेही 2020 साली IIT मुंबईच्या IDC विभागातून इंटरॅक्शन डिझाईनमध्ये मास्टर पूर्ण केला होता. सध्या ती न्यू यॉर्कच्या मॅनहॅटन येथील DE Shaw या आघाडीच्या संस्थेमध्ये Senior Interaction Designer म्हणून कार्यरत आहे.

ऋतु आणि प्राची या सख्ख्या बहिणी देशात पहिल्या ठरल्या आहेत ज्यांची IITच्या M.Des अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. हे यश सोलापूरकरांसाठी एक अभिमानाचे आणि प्रेरणादायी स्थान निर्माण करते. या दोघींनी आपले दहावीपर्यंतचे शिक्षण सेंट जोसेफ हायस्कूल, सोलापूर येथे आणि बारावी संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण केले. बालपणापासूनच दोघींना चित्रकलेची आणि सर्जनशीलतेची आवड होती. डिझाईनमध्ये करिअर करायचे ठरवल्यानंतर त्यांच्या पालकांनी त्यांना भारतातील सर्वोतम मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी मुंबई व अहमदाबाद येथील BRDS (भवर राठोड डिझाईन स्टुडिओ) मध्ये प्रशिक्षणासाठी नेले. BRDS ही बैचलर ऑफ डिझाईन (B. Des) व मास्टर ऑफ डिझाईन (M. Des) विद्यार्थ्यांसाठी पात्र परीक्षेची पूर्व तयारी करवुन घेणारी भारतातील अग्रगण्य संस्था आहे.

स्वतःच्या मुलींसाठी कोचिंग शोधताना आलेल्या अडचर्णीमुळे त्यांनी BRDS ला सोलापूरमध्ये केंद्र सुरू करण्याची विनंती केली, आज BRDS सात रस्ता, सोलापूरमुळे सोलापूर व परिसरातील वि‌द्यार्थ्यांना NID, NIFT, IIT, GLS, MIT, ISDI, Anant, UID, Soft, SPA यांसारख्या भारतातील प्रमुख संस्थांमध्ये प्रवेश मिळत आहे. गेल्या ४ वर्षात २०० हून अधिक वि‌द्यार्थ्यांनी डिझाईन व आर्किटेक्चर हे करीयर म्हणून यशस्वीपणे स्वीकारले आहे.

डिझाईन क्षेत्र दरवर्षी २३ ते २५% दराने वाढत असून भारताला दरवर्षी ६२,००० डिझायनर्सची गरज आहे. मात्र सध्या केवळ १७,००० डिझायनर्स तयार होतात. त्यामुळे या क्षेत्रात दरवर्षी १७ ते ११२ लाख इतके उत्तम वेतन मिळते. डिज़ाइन या क्षेत्रामध्ये प्रचंड संधी आहे, व वि‌द्यार्थी आपल्या आवडत्या छंदाला करीअरचे स्वरुप देऊ शकतात.

ऋतु आणि प्राची या खऱ्या अर्थाने सोलापूर जिल्ह्यातील डिझाईन क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत. त्यांनी देशपातळीवर एक शैक्षणिक विक्रम घडवला आहे.

Previous Post

सोलापूर महापालिकेच्या वतीने पद्मशाली स्मशानभूमीत सुरू करण्यात आली गॅस दाहिनी, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी केली पाहणी

Next Post

आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी यांचे आवाहन

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!
मुख्य बातमी

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक येणार
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक येणार

October 8, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
Next Post
आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी यांचे आवाहन

आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी यांचे आवाहन

ताज्या बातम्या

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

October 10, 2026
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026