• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठात ‘लोककलेच्या ललकारा’चा जल्लोष!

Yes News Marathi by Yes News Marathi
May 29, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर विद्यापीठात ‘लोककलेच्या ललकारा’चा जल्लोष!
0
SHARES
1
VIEWS


अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त योगेश चिकटगावकरांकडून दमदार सादरीकरण

सोलापूर, दि.29- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित मुंबईचे प्रसिद्ध लोककलावंत योगेश चिकटगावकर यांच्या ‘लोककलेचा ललकारा’चा कार्यक्रम अतिशय जल्लोष व उत्साहात पार पडला. यावेळी योगेश चिकटगावकर व त्यांच्या सहकारी कलाकारांनी जुन्या काळातील पिंगळा, वासुदेव, भारुड, गोंधळ आदी लोकगीते सादर करीत लोककला व लोकसंस्कृतीचे उत्कृष्ट दर्शन घडविले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त गेल्या सोमवारपासून विद्यापीठात विविध कार्यक्रम पार पडत आहेत. गुरुवारी लोकगीतांचा कार्यक्रम रंगला. विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

‘गणेश वंदन’ सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर योगेश चिकटगावकर यांनी गोंधळ गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणायला सुरुवात केली. त्यानंतर ‘ज्योत होऊन जळाली.. देवी अहिल्या मर्दानी…’ या अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यावरील गीत सादर करून अहिल्यादेवींचा जयजयकार केला. हरीश तांबोळी यांनी गौळण सादर केली तर विकास साळवे यांनी जय जय होळकरशाहीचा हा पोवाडा सादर केला. नंतर पुन्हा योगेश चिकटगावकर यांनी पिंगळा या लोककलेचे सुंदर दर्शन प्रेक्षकांना घडविले. आपल्या पहाडी व दमदार आवाजात एकापेक्षा एक सुंदर अशी लोकगीते सादर करीत त्यांनी सर्वांची मने जिंकली. प्रेक्षकांनी त्यांना टाळ्यांच्या निनादात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भारुड या लोककला प्रकाराचे देखील यावेळी सादरीकरण झाले. त्यानंतर प्रवीण जाधव यांनीही पोवाडा सादर केले. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली यांनी केले.


Previous Post

महापालिका आयुक्तांनी दत्त चौकातील झोन कार्यालय क्रमांक एक मध्ये घेतला जनता दरबार…

Next Post

चर्मकार समाज वधू-वर परिचय मेळाव्यास 1000 समाज बांधव उपस्थित राहणार….

Related Posts

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन

November 14, 2026
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!
इतर घडामोडी

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!

November 14, 2026
आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव
इतर घडामोडी

आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव

November 13, 2026
कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी
इतर घडामोडी

कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी

November 13, 2026
सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा

November 13, 2026
Next Post
चर्मकार समाज वधू-वर परिचय मेळाव्यास 1000 समाज बांधव उपस्थित राहणार….

चर्मकार समाज वधू-वर परिचय मेळाव्यास 1000 समाज बांधव उपस्थित राहणार….

ताज्या बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती

November 17, 2026
चौथ्यांदा आयर्नमॅन ठरले सोलापूरचे एकमेव डॉ. अभिजित वाघचवरे

चौथ्यांदा आयर्नमॅन ठरले सोलापूरचे एकमेव डॉ. अभिजित वाघचवरे

November 17, 2026
सोलापुरात राजू शेट्टींचा चकवा..पोलिसांची धांदल..पहाटे एक मोठा ट्विस्ट…!

सोलापुरात राजू शेट्टींचा चकवा..पोलिसांची धांदल..पहाटे एक मोठा ट्विस्ट…!

November 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026