सोलापूर: वैशपायन स्मृती शासकीय महाविद्यालय सोलापूर येथे” दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्चार रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांच्यासमोर डॉ: वर्षा राम कोकणे ( सहायक प्राध्यापक सूक्ष्मजीव शास्त्र विभाग)
यांनी प्रतिज्ञा वाचून शपथ घेण्यात आली,यावेळी महाविद्यालयाचे व रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी शैलेश जाधव, लक्ष्मी मेळकुंदे, सहाय्यक प्राध्यापक : डॉ अपेक्षा चोपडे, डॉ मनोज वेदपाठक, व विविध अधिकारी उपस्थित होते.



प्रतिज्ञा
आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभिर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णु करु, तसेच मानवी जिवीत मूल्ये धोक्यात आणणा-या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु.”