• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

हत्तुर येथील सोमेश्वर-बनसिध्देश्वर मंदिरासाठी 3 कोटी 76 लाखांचा निधी मंजूर…

by Yes News Marathi
March 31, 2025
in इतर घडामोडी
0
हत्तुर येथील सोमेश्वर-बनसिध्देश्वर मंदिरासाठी 3 कोटी 76 लाखांचा निधी मंजूर…
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आ. सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नांना यश , मंदिर परिसराचा होणार कायापालट

सोलापूर-दक्षिण तालुक्यातील हत्तुर येथील सोमेश्वर व बनसिध्देश्वर मंदिर देवस्थानच्या करण्यात येणार्‍या विविध विकासकामांसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून 3 कोटी 76 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आ. सुभाष देशमुख यांनी या कामासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. नुकतेच त्यांनी यासाठी ग्रामविकासमंत्र्यांसोबत बैठक घेऊन निधीची मागणी केली होती. अखेर त्याला यश आले आहे.

आ. सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे हत्तुर येथील सोमेश्वर व बनसिध्देश्वर मंदिरास तीथक्षेत्र ब दर्जा प्राप्त झाला होता. आ. देशमुख यांनी येथील ग्रामस्थांना या सुशोभिकरणाचा शब्द दिला होता. त्यासाठी त्यांनी वारंवार मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. या ठिकाणी भक्तनिवासासह विविध विकासकामांसाठी आ. सुभाष देशमुख यांनी 5 कोटींची मागणी केली होती. याबाबत 24 मार्च रोजी ग्रामविकासमंत्र्यासोबत बैठक घेतली होती. ग्रामविकास विभाागाने यासाठी 3 कोटी 76 लाखांचा निधी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात 75 लाखांचा निधी वितरीतही करण्यात आला आहे. या निधीमधून महिला आणि पुरूषांसाठी स्वतंत्र भक्त निवास बांधणे, सार्वजनिक शौचालय, स्नानगृह बांधणे, पाणी पुरवठा करणे, वाहनतळ बांधणे यासह परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. लवकरच या कामांना सुरूवात होणार आहे. यामुळे मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे. निधी मंजूर करून घेतल्याने ग्रामस्थांनी आ. देशमुख यांचे आभार मानले आहेत.

मंदिर राज्यात नावारूपाला आणणारः आ. देशमुख
ग्रामस्थांना मी शब्द दिला होता, तो पूर्ण केला आहे. आगामी काळात मंदिराच्या सुशोभीकरणासाठी व तीर्थक्षेत्र विकासाच्या अनुषंगाने मंदिर राज्यात नावारूपाला येण्यासाठी पूर्ण सहकार्य करणार असल्याचे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.

Previous Post

तरुणाने कंपनीकडे पेट्रोल पंपासंबंधी केली तक्रार…. मालकाला 60 हजार रुपयांचा दंड…

Next Post

सुंद्रीसम्राट सिद्राम जाधव यांच्या स्मृती संगीत महोत्सवात सुंद्री, गायन, पखवाज सतार वादनाने सोलापूरकर रसिक मंत्रमुग्ध…

Next Post
सुंद्रीसम्राट सिद्राम जाधव यांच्या स्मृती संगीत महोत्सवात सुंद्री, गायन, पखवाज सतार वादनाने सोलापूरकर रसिक मंत्रमुग्ध…

सुंद्रीसम्राट सिद्राम जाधव यांच्या स्मृती संगीत महोत्सवात सुंद्री, गायन, पखवाज सतार वादनाने सोलापूरकर रसिक मंत्रमुग्ध...

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group