• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अश्विनी सहकारी रुग्णालय येथे नवीन एमआरआय व जीई-आयसीयुचे बिपीनभाई पटेल यांच्या हस्ते उद्घाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
January 8, 2025
in इतर घडामोडी
0
अश्विनी सहकारी रुग्णालय येथे नवीन एमआरआय व जीई-आयसीयुचे बिपीनभाई पटेल यांच्या हस्ते उद्घाटन
0
SHARES
0
VIEWS

सोलापुर : आज दि.०८ जानेवारी २०२५ रोजी नवीन १.५ टी एमआरआयचे व नूतनीकरण केलेल्या ग्रॅस्ट्रोएंटरोलॉजी आयसीयु (जीई-आयसीयु) चे उ‌द्घाटन चेअरमन बिपीनभाई पटेल यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी रुग्णालयातील संचालक मंडळ सदस्य, तज्ञ डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि मान्यवर उपस्थित होते.

१९८२ मध्ये अश्विनीची स्थापना झाल्यापासून आजतागायत ती वृध्दिंगत होत आहे. सोलापूरच्या भौगोलिक रचनेमुळे कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील ६ जिल्ह्यातून – विजयपूर, कलबुर्गी, रायचूर, बिदर, लातूर, उस्मानाबाद येथील रुग्ण मोठ्या प्रमाणात सोलापूरच्या वैद्यकीय सेवेचा लाभ घेतात. येथील डॉक्टर्स विशेषतः तज्ञ डॉक्टर्स निष्णात तर आहेतच परंतु अखंड परिश्रम आणि इमर्जन्सी सेवा देण्यात २४ तास अहोरात्र तत्पर असतात. त्याचा फार मोठा दिलासा रुग्ण आणि नातेवाईकांना होत आहे. गेल्या चार दशकापासून अव्याहतपणे हे चालू आहे. अहर्निश रुग्णांचा लोंढा सोलापूरकडे येत आहे. हे येथील डॉक्टर समूहाच्या विश्वासार्हतेचे फलित आहे. समस्त डॉक्टर्स आणि सहकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन सोलापूर व नजीकच्या परिसरातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना माफक दरामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यामध्ये अश्विनी सहकारी रुग्णालय हे कायम अग्रेसर आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये होणारे बदल अंगीकृत करुन सोलापूरकरांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा देण्यामध्ये अश्विनी व त्यांचे संचालक मंडळ कायम प्रयत्नशील असते.

त्याचाच एक भाग म्हणून नवीन १.५ टी एमआरआय प्रस्थापित करण्यात आले आहे. या सिमेन्स कंपनीच्या एमआरआय चे वैशिष्ट्य कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर [A.I.] व कार्डियाक इमेजिंग हा आहे. या नवीन एमआरआय मशिनचा उपयोग मेंदू, सांधे, मणके इत्यादींच्या रुग्णांची तपासणी करुन, त्यांचे अचूक निदान करण्यात येते कार्डियाक इमेजिंगमध्ये प्रमुखतः कार्डियाक व्हायबिलिटी टेस्ट, कार्डियाक फंक्शनल टेस्ट, इत्यादी समाविष्ट आहेत. याचा फायदा रुग्णांना निश्चितच होईल.

बिपीनभाई पटेल यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि त्यांना सक्रीय सेवाभावी संचालकांची मिळालेली मोलाची समर्थ साथ यामुळे आणि ११० पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टरांच्या अथक परिश्रमांच्या साथीने, कार्यतत्पर आधिकारी आणि कर्मचारी यांच्या सामूहिक टीमवर्कमुळे रुग्णालयात एकाच छताखाली वैद्यकीय क्षेत्रातील जवळजवळ सर्व सेवा ३०० बेडस्च्या या रुगणालयात २४ तास अहोरात्र रुग्णांसाठी मिळत आहेत. अत्यवस्थ रुग्णांना तर हे रुग्णालय एक वरदानच आहे.

NABH च्या मार्गदर्शकचे तत्त्वानुसार रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर ग्रॅस्ट्रोएंटरोलॉजी आयसीयु (जीई-आयसीयु) नूतनीकरण करण्यात आले आहे. या आयसीयु मध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, सेंट्रल एअरकंडीशनिंग, सेंट्रल ऑक्सिजन, मॉनिटर्स, व्हेंटीलेटर्स इत्यादी सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. या आयसीयुचे कामकाज डॉ. सुजीत जहागीरदार व डॉ. विनित वाकडे हे पाहणार आहेत.

कोविड १९ जागतिक महामारीमध्ये रुग्णसेवेत अश्विनीने केलेली रुग्णसेवा ही शब्दातीत आहे. त्याचबरोबर कोविड प्रतिबंधक लस टोचणी केंद्र म्हणून गौरवास्पद कार्य अश्विनीने केले आहे आणि करीत आहे.

बिपीनमाईंनी आणि सहकाऱ्यांनी रुग्णालयामध्ये क्रांतीकारी परिवर्तन यशस्वीपणे आणले असून, पुणे, मुंबई, हैदराबाद येथील दर्जाच्या सेवा योग्य दरामध्ये त्यांनी अश्विनीमध्ये उपलब्ध करुन दिल्या आहेत.

अश्विनीच्या वैद्यकीय सेवेचा वारसा अखंड असेच पुढेही चालू राहणार आहेत. याचे कारण येथील पायाभूत सुविधा आणि अविश्रांत कार्यरत असणारे डॉक्टर्स आणि त्यांचे सर्व सहकारी हे आहेत.

Previous Post

बालाजी अमाईन्सच्यावतीने सी. एस. आर अंर्तगत बाबुराव पाटील वि‌द्यालय गोटेवाडी ता मोहोळ येथे बांधण्यात आलेल्या दोन वर्गखोल्याच्या इमारतीचे लोकार्पण

Next Post

राज्यात प्रतिभावंत खेळाडू घडविण्यासाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करणार

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
राज्यात प्रतिभावंत खेळाडू घडविण्यासाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करणार

राज्यात प्रतिभावंत खेळाडू घडविण्यासाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करणार

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026