• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी : छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेस प्रचंड प्रतिसाद

Yes News Marathi by Yes News Marathi
September 21, 2024
in इतर घडामोडी
0
प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी : छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेस प्रचंड प्रतिसाद
0
SHARES
1
VIEWS

श्री प्रतापगडाचा रणसंग्राम हा जगातील अद्वितीय पराक्रम

सोलापूर : छत्रपती श्री शिवरायांनी क्रूरकर्मा अफजलखानाला त्याच्या कृत्यांची शिक्षा देऊन संपवले. श्री प्रतापगडाचा रणसंग्राम हा जगातील लढायांपैकी अद्वितीय पराक्रम आहे, असे प्रतिपादन छत्रपती श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी केले.

३५० व्या श्री शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त समस्त हिंदू समाजातर्फे जुनी मिल कंपाउंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये २५ सप्टेंबरपर्यंत आयोजित छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी मार्गदर्शन केले. ‘शिवप्रताप ‘ या विषयावर बोलताना त्यांनी कान्होजी जेधे, प्रतापगड युद्धनीती, जावळीचा वेढा आणि अफझलखान वध आदींवर विवेचन केले.

प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी म्हणाले, आदिलशाहीच्या आदेशानुसार विजापूरवरून निघाल्यानंतर अफजल खानाने पंढरपूर, तुळजापूर येथील मंदिरांची तोडफोड करून त्यांची नासधूस केली. कान्होजी जेधे यांनाही अफजलखानाने पत्र पाठवून बोलावले. परंतु कान्होजी जेधे हिंदवी स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्यासारख्या असंख्य एकनिष्ठ सहकाऱ्यांमुळे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी भगव्या झेंड्याचे राज्य स्थापन केले. अफजल खान वधानंतर छत्रपती श्री शिवरायांची कीर्ती भारतभरात पसरली आणि त्यांच्या नावाची जरब बसली, असेही प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी सांगितले.

याप्रसंगी सिनेकलावंत आमीर तडवळकर यांच्या समर्पित नाट्यशाळेच्या कलाकारांनी ‘अफजल खान वध’ हा चित्तथरारक प्रसंग नाट्यरूपातून उत्तमरित्या सादर केला. यावेळी उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात बालकलाकारांचे कौतुक केले.

सी. ए. राजगोपाल मिणीयार यांनी प्रास्ताविक तर गुरुशांत धुत्तरगावकर यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट

आज ‘ शिवधैर्य ‘ या विषयावर मार्गदर्शन अन् प्रसंग सादरीकरण

जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये सुरू असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेमध्ये रविवारी दुपारी ४ ते ७.३० दरम्यान प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी ‘ शिवधैर्य ‘ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रसंग सादरीकरणदेखील होणार आहे. सोलापूरकरांनी या कथेस उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.

Previous Post

सोनाई फाउंडेशनच्या युवराज राठोड ने जिंकली दक्षिणचे युवकांची मने

Next Post

मंगळवेढ्यात उद्या वारकरी भवनाचा लोकार्पण सोहळा

Related Posts

सोलापुरात दराच्या स्पर्धेत भीमा अग्रेसर गळीत हंगाम 25-26 मधील ऊसाला 3011 रुपये देणार – खा. महाडिक
इतर घडामोडी

सोलापुरात दराच्या स्पर्धेत भीमा अग्रेसर गळीत हंगाम 25-26 मधील ऊसाला 3011 रुपये देणार – खा. महाडिक

September 27, 2026
पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन
इतर घडामोडी

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.
इतर घडामोडी

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026
मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.
इतर घडामोडी

मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.

September 26, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
Next Post
मंगळवेढ्यात उद्या वारकरी भवनाचा लोकार्पण सोहळा

मंगळवेढ्यात उद्या वारकरी भवनाचा लोकार्पण सोहळा

ताज्या बातम्या

युवा महोत्सवासाठी शिवाजी महाविद्यालयाची नगरी सज्ज!

युवा महोत्सवासाठी शिवाजी महाविद्यालयाची नगरी सज्ज!

September 27, 2026
दुष्काळ जाहीर झाला मात्र मदत कधी मिळणार याकडे लागले डोळे…!

दुष्काळ जाहीर झाला मात्र मदत कधी मिळणार याकडे लागले डोळे…!

September 27, 2026
उद्या सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’मधून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर

उद्या सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’मधून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर

September 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026