सोलापूर: मंद्रुप येथील मौलाना आझाद चौकात ईद ए मिलाद निमित्ताने सोनाई फाऊंडेशन सोलापूर यांच्या वतीने भव्य दिव्य कव्वालीचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन सोनाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांनी केले होते.
या कार्यक्रमाचे संयोजन ईद ए मिलादुन्नबी उत्सव मध्यवर्ती समिती मंद्रुप तसेच शान युवक संघटना मंद्रुप यांनी केले होते. मुंबईचे सुप्रसिद्ध कव्वाली सादरकर्ते हाजी सुलतान नाझा यांनी एका पेक्षा कव्वाली सादर केल्या. मंद्रुपसह पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रक्षेकांची त्यांनी मने जिंकली.
विशेषता उडता सुरज ढलता जाये, झुम भराभर झुम शराबी या कव्वालीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.
सोनाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख अणप्पा सत्तूबर, मंद्रुप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार, मंद्रुपच्या सरपंच अनिता कोरे, ग्रामपंचायत सदस्य तथा ईद ए मिलाद उत्सव समितीचे अध्यक्ष यासीन मकानदार, माजी पंचायत समिती सभापती गुरूसिध्द म्हेत्रे, सुरेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे, ग्रामपंचायत सदस्या रियाना शेख, मंद्रुप पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजु डांगे, निंबर्गीचे उपसरपंच पीरसाहेब हवालदार यांच्यासह मंद्रुप येथील प्रतिष्ठीत नागरिकांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सुरेश टेळ्ळे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी तालुकाध्यक्ष तथा माजी उपसरपंच रमेश नवले, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर कोरे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिध्द मुगळे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संतोष बरूरे यांच्यासह ईद मिलाद उत्सव समितीचे कार्यकर्ते आणि शान युवक संघटनेतील कार्यकर्ते समवेत मंद्रुपसह पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंद्रुप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार, पोलिस उपनिरीक्षक राजु डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.