सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील आठवडा बाजारपेठेत स्वयंम शिक्षा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ ऊर्फ सोमेश वैद्य आणि सोनाई प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष युवराज भैय्या राठोड यांच्या संयुक्त विद्यमाने मंद्रुप येथील शुक्रवारी आठवडा बाजारातील सर्व व्यापारांना मायेची सावली आणि मायेची ऊब म्हणून छत्री देण्यात आली.
मंद्रूप तालुका स्तरावरील गाव असल्याने येथे नागरिकांचे प्रचंड गर्दी असते जवळपास मंद्रुप येथील शुक्रवारी आठवडा बाजारपेठेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांतील नागरीक हे संसारोपयोगी वस्तू भाजी पाला अनेक वस्तू खरेदी करण्यासाठी येत असतात या सर्व नागरिकांना सोमेश वैद्य आणि युवराज भैय्या राठोड यांनी वाटप केलेल्या छत्रीनी आकर्षित केलेले होते.
संपूर्ण बाजारपेठेतील छत्र्या वरती एकच ध्यास दक्षिण सोलापूर चा विकास या छत्री वरील वाक्याने आणि सोमेश वैद्य आणि युवराज भैय्या राठोड यांच्या जोडीच्या फोटो मुळे मंद्रुप बाजारपेठेसह मंद्रुप मध्ये जोरदार चर्चेला उदान आले आहे.
संपूर्ण व्यापारी वर्गातून स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सोमेश वैद्य त्याचबरोबर सोनाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवराज भैय्या राठोड यांचे कौतुक होत आहे.