सोलापूर : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड,जिल्हा शाखा, सोलापूर संचलित सर्व विभागांचा संयुक्त शिक्षक दिन कार्यक्रम एन.ए.बी.शिक्षण संकुल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाईंडचे अंध विद्यार्थ्यांनींनी स्वागतगीत गाऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.रजनीश जोशी सर (ज्येष्ठ संपादक सकाळ मीडिया) मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ .सर्वपल्ली राधाकृष्णन व मातोश्री चंद्रभागाबाई यलगुलवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले व संस्थेतील सर्व विभागातील शिक्षकांचा भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सेक्रेटरी मा. के.डी.पाटील सर यांनी आपल्या मनोगतात प्रत्येक शिक्षकांनी नवीन उपक्रम राबवण्याचा संकल्प करावा ,विद्यार्थीकडे लक्ष्य केंद्रित करून वेळ देवून सर्वांगीण विकास करावा, व्यक्त केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रकाशजी यलगुलवार साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांनीही शिक्षकांना शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रमुख अतिथी मा.रजनीश जोशी सर यांनी शिक्षकानी काळानुसार व अद्यावत ज्ञान घेणे आवश्यक आहे. संगणक व मीडिया यात पारंगत असले पाहिजे, असे आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून संस्थेचे सहसेक्रेटरी मा. अनुगीता पवार मॅडम यांनी संस्थेची माहिती सांगितली. प्रमुख पाहुण्याची ओळख प्रा. जोतिबा काटे यांनी केले. तर सूत्रसंचालन जगदाळे सर यांनी केले. तर आभार संस्थेचे सहसेक्रेटरी मा.सीमा यलगूलवार यांनी मानले. यावेळी नॅब संस्थेचे उपाध्यक्ष मा.अंकुश कदम, मा. शशीभूषण यलगुलवार, मा.माणिक यादव, मा. देवेंद्र भंडारे, मा. डॉ. किशोर देशपांडे , मा. शिवाजी जाधव , मा. हार्दिक निमाणी , सर्व.विभागाचे प्रमुख व शिक्षक यांची उपस्थिती होती.