• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणार्यांना होणार 5 वर्ष तुरुंगवास

Yes News Marathi by Yes News Marathi
April 11, 2023
in मुख्य बातमी
0
सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणार्यांना होणार 5 वर्ष तुरुंगवास
0
SHARES
0
VIEWS

नांदेड सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

नांदेड – महागाईविरोधात आंदोलन करणं शिवसैनिकांना चांगलचं महागात पडलंय. कोर्टाने 19 जणांना तब्बल 5 वर्षांची तुरुंगवास आणि 1 लाख 60 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 2008 साली नांदेडमध्ये शिवसेनेने महागाई विरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलना दरम्यान काही बसेस वर दगडफेक करण्यात आली होती. शिवाय दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकरणात एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले.

जखमी झालेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. जिल्हा सत्र न्यायाधीश एस ई बांगर यांनी सर्व आरोपींना वेगवेगळ्या कलमाखाली शिक्षा ठोठावली. यात महत्त्वाचे म्हणजे कलम 353 अंतर्गत 2 वर्षांची शिक्षा आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्या प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे मालमत्तेचं नुकसान केल्या प्रकरणी न्यायालयाने सर्व आरोपींना प्रत्येकी 1 लाख 60 हजार 750 असा एकूण 30 लाख 54 हजार 250 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

आरोपींमध्ये तत्कालीन आमदार अनुसाया खेडकर, त्यांचा मुलगा महेश खेडकर, शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, माजी जिल्हाप्रमुख भुजंग पाटील सह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याने सर्व आरोपींची रवानगी कारागृहात होणार आहे. नांदेड न्यायालयाने अश्या प्रकरणात आरोपींना 5 वर्षांची शिक्षा आणि एव्हढा मोठा दंड आकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रीया आरोपींच्या वकिलांनी दिली.

काय आहे कायदा?
16 एप्रिल 2009 मध्ये सुप्रिम कोर्टाने एका प्रकरणात एक मार्गदर्शक सूचना जारी केली होती. यात स्पष्ट नमुद करण्यात आलं, संप, बंद किंवा निषेधाच्यावेळी सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेचं नुकसान केलं तर त्याची भरपाई ज्या व्यक्तीने किंवा एखाद्या संस्थेने केली असल्यास त्यांच्याकडूनच ती वसूल केली जाईल.

एखादी व्यक्ती किंवा संस्थेने सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्यास पीडीपीपी कायद्यानुसार म्हणजेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा 1984 अंतर्गत कारवाई देखील होऊ शकते. यात 6 महिन्यांपासून 10 वर्षांपर्यंतच्या तुरूंगवासाची तरतूद आहे. या व्यतिरिक्त हिंसाचार, दंगली, जाळपोळ आणि बंडखोरी करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेनुसार कारवाई होऊ शकते.

Previous Post

क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या 196 व्या जयंती निमित्त जी.एम संस्थेतर्फे अभिवादन…

Next Post

अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचे लेटेस्ट फोटोशूट!

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचे लेटेस्ट फोटोशूट!

अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचे लेटेस्ट फोटोशूट!

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

June 14, 2026
विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

June 13, 2026
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

June 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026