• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आत्मक्लेश यात्रेद्वारे प्रलंबित प्रश्नासाठी सोलापूर ते मुंबई पायी वारी करणारे अर्जुन रामगिर मुख्यमंत्र्याच्या भेटीला

Yes News Marathi by Yes News Marathi
March 29, 2023
in इतर घडामोडी
0
आत्मक्लेश यात्रेद्वारे प्रलंबित प्रश्नासाठी सोलापूर ते मुंबई पायी वारी करणारे अर्जुन रामगिर मुख्यमंत्र्याच्या भेटीला
0
SHARES
1
VIEWS
  • सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित नागरी प्रश्न तातडीनं सुटावेत या मागणीसाठी 72 वर्षीय अर्जुन रामगिर यांनी आत्मक्लेश यात्रेची सुरुवात केली. यासाठी त्यांनी सोलापूर ते मुंबई असा पायी चालत प्रवास केला. अखेर अर्जुन रामगिर यांच्या आत्मक्लेश यात्रेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. तसेच, शक्य तेवढे सर्व नागरी प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी रामगिर यांना दिलं.
  • सोलापूर जिल्ह्यातील अनेक प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे हा भाग विकासापासून वंचित राहिला आहे. शहरातील विमानतळ फनेलच्या आड येणाऱ्या चिमणीचा विषय असेल, उजनी धरणाच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेची रखडपट्टी असेल किंवा मग उद्योग धंद्यांचा अभाव असेल, शहराला पाच दिवसातून एकदा होणारा पाणीपुरवठा असेल असे अनेक प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. या सर्व कारणांमुळे सोलापूर जिल्हयातून गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले असून वेळीच ते रोखणे गरजेचे आहे. तसेच या प्रश्नांकडे सर्वच राजकीय नेते आणि पक्षाकडून दुर्लक्ष झाले असल्याने अखेर हे प्रश्न तातडीने सुटावेत यासाठी सोलापूर ते मुंबई आत्मक्लेश यात्रा काढण्याचा संकल्प अर्जुन रामगिर यांनी केला. त्यानुसार त्यांनी वयाच्या 72 व्या वर्षी थेट पायी मुंबईकडे चालत जाण्याचा निर्धार केला.
  • रामगिर पनवेलपर्यंत चालत आल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्याच वेळी ते मुंबईकडे चालत येत असल्याची बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली. मुख्यमंत्र्यांनी तातडीनं दखल घेत पनवेलमधील शिवसेनेचे महानगरप्रमुख आणि माजी नगरसेवक अॅड. प्रथमेश सोमण यांना त्यांची विचारपूस करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रामगिर यांची विचारपूस केली. त्यांच्यावर प्रथमोपचार करून मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, त्यांचा वर्षा बंगल्यावर पाहुणचार करण्यात आला. त्यानंतर ठाण्यात मुख्यमंत्र्यांनी रामगिर यांची भेट घेतली.
  • मुख्यमंत्र्यांनी रामगिर यांची भेट घेतली आणि त्यांनी रामगिर यांच्या सगळ्या मागण्या ऐकून घेतल्या. तसेच, सर्व मागण्या लेखी देण्यासही सांगितल्या. तसेच, सोलापूर शहरातील चिमणीचा प्रश्न मला माहित असून तो लवकरच सोडवू असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं. सोलापूर जिल्ह्यातील इतरही विकासकामांना प्राथमिकता देऊन त्यातील जी कामं तातडीनं सोडवता येथील ती नक्की सोडवू, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी रामगिर यांना दिलं.
  • सोलापूर शहरातील सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा रामगिर यांचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचं शिंदे यांनी म्हटलं. तसेच अशा सर्वसामान्य लोकांसाठी माझ्या वर्षा बंगल्याचे दरवाजे सदैव उघडे असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी समाधानाने पुन्हा सोलापूर जाण्याचा निर्णय घेतला.
Previous Post

सोलापूर जिल्ह्याच्या विकासार्थ तीर्थक्षेत्र जिल्हा म्हणून घोषित करा – खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी

Next Post

करमुसे मारहाण प्रकरणातील आरोपी जितेंद्र आव्हाडांचा अंगरक्षक वैभव कदमची आत्महत्या

Related Posts

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च
इतर घडामोडी

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च

September 6, 2026
हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
Next Post
करमुसे मारहाण प्रकरणातील आरोपी जितेंद्र आव्हाडांचा अंगरक्षक वैभव कदमची आत्महत्या

करमुसे मारहाण प्रकरणातील आरोपी जितेंद्र आव्हाडांचा अंगरक्षक वैभव कदमची आत्महत्या

ताज्या बातम्या

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026