• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन

Yes News Marathi by Yes News Marathi
March 29, 2023
in मुख्य बातमी
0
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन
0
SHARES
1
VIEWS

भाजप खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते. पुण्यात भाजपची यशस्वी वाटचाल करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. पुण्याची ताकद गिरीश बापट अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुण्यातील कसबा मतदार संघात आणि इतर पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली होती.
बापटांची राजकीय कारकीर्द…
टेल्को कंपनीत 1973 ला कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. 1983 ला पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
1993 ला झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांचा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिलं नाही.1995 पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार म्हणून विजयी झाले होते. राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यानंतर 2019 ला पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते.
पोटनिवडणुकीच्या वेळी सक्रिय सहभाग…
महिन्याभरापूर्वी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पोटनिवडणुक झाली. या निवडणुकीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होा. सुरुवातील प्रकृतीमुळे प्रचारात सक्रिय राहणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र पक्षनिष्ठा जपत ते पोटनिवणुकीसाठी ऑक्सिजन लावून आणि व्हिलचेअरवर भाजपच्या मेळाव्यासाठी पोहचले होते. त्यांनी आजारी असतानाही मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर गुढीपाडव्यानिमित्त कसबा गणपतीसमोर गिरीश बापटांच्या खासदार निधीतून करण्यात आलेल्या विकास कामांच्या उद्घाटनाला गिरीश बापट यांच्याकडून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर आणि त्यांचे भाजपमधील प्रतिद्वंद्वी हेमंत रासने यांना आमंत्रित करण्यात आले होते. हा सर्वसमावेशकपणा हेच गिरीश बापट यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य होते आणि चाळीस वर्षांच्या यशस्वी राजकीय कारकीर्दीचे रहस्य होते.
आजारी असताना अनेक नेत्यांनी घेतली होती भेट..
गिरीश बापट आजारी असताना भाजपच्याच नाहीतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही त्यांची भेट घेतली होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतच इतर नेत्यांनीही भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यांच्या जाण्याने भाजपच मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Previous Post

कर्नाटकात 10 मे रोजी मतदान, 13 मे रोजी निकाल; विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Next Post

“बॉलिवुड हंगामा अवॉर्ड्स नाईटमध्ये मौनी रॉयचा ऑरेंज ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये जबरदस्त लुक”

Related Posts

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!
मुख्य बातमी

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
Next Post
“बॉलिवुड हंगामा अवॉर्ड्स नाईटमध्ये मौनी रॉयचा ऑरेंज ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये जबरदस्त लुक”

"बॉलिवुड हंगामा अवॉर्ड्स नाईटमध्ये मौनी रॉयचा ऑरेंज ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये जबरदस्त लुक"

ताज्या बातम्या

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026