• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तुळजापुरात तिरुपतीच्या धर्तीवर हायटेक दर्शनाची व्यवस्था, एक हजार कोटींचा विकास आराखडा तयार

Yes News Marathi by Yes News Marathi
March 22, 2023
in इतर घडामोडी
0
तुळजापुरात तिरुपतीच्या धर्तीवर हायटेक दर्शनाची व्यवस्था, एक हजार कोटींचा विकास आराखडा तयार
0
SHARES
1
VIEWS

धाराशिव: तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासाठी प्रशाद योजनेतून एक हजार कोटींचा नवा आराखडा तयार होत आहे. यातून दर्शन अधिक सुलभ करण्यासाठी तसेच भाविकांच्या वेळेची बचत व्हावी, यासाठी शिर्डी, तिरूपती देवस्थानच्या धर्तीवर बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांचा वेळ वाचेल आणि गर्दीचंही नियंत्रण होईल.

नव्या योजनेमुळे दर्शनासाठी आपला नंबर कधी येणार हे भक्तांना आधीच कळणार आहे. त्यासाठी वाहन पार्किंग परिसरातच काऊंटर पास दिले जातील. त्यावरील वेळेनुसार तासभर आधी मंदिर आवारात भाविकांना प्रवेश मिळेल. दर्शन लाईन प्रकल्पातून टप्प्याटप्याने भाविकांना थेट मंदिरात सोडले जाणार आह

महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजाभवानी मातेच्या शक्तीपीठाला विकासाची प्रतीक्षा आहे. अलीकडच्या काळात मंदिरात वाढलेली गर्दी आणि कमी पडत असलेल्या सुविधांच्या पार्श्वभूमीवर विकास आराखडा राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये तुळजापुरात झालेल्या प्रचारसभेत मंदिराच्या विकासाची ग्वाही दिली होती. त्यानंतर नऊ वर्षानंतर यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या आहेत.

कसा असेल विकास आराखडा?

  • नव्या आराखड्यात वातानुकुलित सभागृहातून दर्शनाची रांग असणार आहे.
  • एकूण 10 वातानुकुलित सभागृह आहेत.
  • या सभागृहांची क्षमता ही एक लाख भाविक इतकी असेल.
  • एका सभागृहातून दुसऱ्या सभागृहात पाठवून भाविकांना टप्प्याटप्प्याने मंदिरात सोडले जाईल
  • दर्शनाला किती वेळ लागेल हे आधीच कळणार आहे.
  • वाहन पार्किंगच्या ठिकाणीच काऊंटर पास मिळेल.
  • भाविकांना मंदिर परिसरात तासभर आधी प्रवेश मिळेल.
  • मंदिर परिसरातील बांधकामात बदल होणार आहेत.

मंदिर संस्थानच्या नव्या विकास आराखड्याला ‘प्रशाद योजने’तून निधी मिळणार आहे. सुरूवातीला एक हजार कोटींचा आराखडा राबविला जाईल. या आराखड्यात तुळजापुरात येणाऱ्या प्रत्येक प्रमुख मार्गावर शहराबाहेर म्हणजे नळदुर्ग रोड, हुडको, आराधवाडी भागात पार्किंग सुविधा असेल.सध्याच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येतील. त्याचठिकाणी भाविकांचे साहित्य ठेवण्याची सोय करण्यात येणार आहे.

तुळजापूर शहरालगत रामदरा परिसरात उद्यान साकारले जाणार आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. शहरात येणाऱ्या प्रत्येक प्रमुख मार्गावर आता दगडी कमानी उभारण्यात येणार आहेत. शासनाकडे प्रस्ताव पाठवून मान्यता आल्यानंतर गरजेनुसार बदल केले जातील. यापूर्वी 325 कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबविण्यात आला होता. यातून तुळजापूर शहराचा पुरेसा विकास झाला नाही.

Previous Post

रमजान महिन्याला ‘या’ दिवसापासून होणार सुरुवात !

Next Post

अभिनेत्री संजना सांघीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

Related Posts

कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा
इतर घडामोडी

कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा

September 15, 2026
दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती
इतर घडामोडी

दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

September 15, 2026
गणेश विसर्जनाच्या तयारीचा महापौर विनायक कोंड्याल यांनी घेतला आढावा
इतर घडामोडी

गणेश विसर्जनाच्या तयारीचा महापौर विनायक कोंड्याल यांनी घेतला आढावा

September 15, 2026
सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!
इतर घडामोडी

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

September 14, 2026
देवकर कुटुंबीयांच्या घरी बाप्पाचे मंगलमय आगमन
इतर घडामोडी

देवकर कुटुंबीयांच्या घरी बाप्पाचे मंगलमय आगमन

September 14, 2026
विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
Next Post
अभिनेत्री संजना सांघीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

अभिनेत्री संजना सांघीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

ताज्या बातम्या

पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!

पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!

September 15, 2026
कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा

कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा

September 15, 2026
दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

September 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026