सोलापूर: श्री शिवानंद आश्रम दमानी नगर लक्ष्मी पेठ या ठिकाणी सोमवार दिनांक २० फेब्रुवारी २०२३ ते सोमवार २७ फेब्रुवारी २०२३ या कालावधी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन श्री शिवानंद आश्रम व्यवस्थापक मंडळ ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. श्री सद्गुरू शिवानंद स्वामी यांच्या ४२ व्या समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह केला जातो. ह भ प शंकरानंद स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली याची सुरुवात २० फेब्रुवारी रोजी झाली असून पहिल्या दिवशी ह.भ.प.विश्वनाथ उद्दल महाराज यांच्या कीर्तनाने तसेच सदगुरु श्री शिवानंद स्वामी महाराज परभणीकर यांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करून झाली.दुसऱ्या दिवशी नामदेव महाराज देवकते, तिसऱ्या दिवशी दत्तात्रय महाराज भोसले,चौथ्या दिवशी मारुती महाराज तुणतुणे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. पाचव्या दिवशी देगाव येथील मंगेश महाराज कोरे यांची कीर्तन सेवा होणार आहे. शनिवारी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांची कीर्तन सेवा होणार आहे. शेवटच्या दोन दिवसात आपेगावचे ह.भ.प. ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूरकर यांच्या कीर्तनाने सप्तहाची सांगता होणार आहे. तरी भाविकांनी लाभ घाव असे आवाहन ह.भ.प. गोविंद माने यांनी केले आहे.
यावेळी ट्रस्टचे सिद्धराम ठेंगील,युवराज कुरुलकर,ह.भ.प.अनंत महाराज इंगळे, सिद्धलिंग स्वामी,दिनेश भोसले, विलास जाधव,शिवानंद कणसे,माऊली जरग,दत्तात्रय कांबळे,कमलेश सातपुते,अरविंद कलाल, तसेच श्री संत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेतील विध्यार्थी व वारकरी महिला मोठ्या संख्येने या कर्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत. तसेच या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी सुप्रसिद्ध हरि भक्तिपरायण महाराजांचे हरिकीर्तन व हरिजागर होणार आहे. त्याचप्रमाणे पहाटे काकड आरती, मूर्तीची पूजा , विष्णुसहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, महिलासंगीत भजन सामुदायिक हरिपाठ, हरी किर्तन हरिजागर व भारुडे .अशी धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहेत. या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी अवश्य लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आल आहे.