• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 3, 2023
in मुख्य बातमी
0
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
0
SHARES
1
VIEWS

ईडीच्या पथकाने बँकेच्या पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर कोल्हापूर जिल्हा बँकेतील कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज सकाळी एक तास कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत ईडीच्या कारवाईचा निषेध केला.
माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाहूपुरीमधील मुख्यालयासह सेनापती कापशी येथील जिल्हा बँक शाखा तसेच हरळी येथील कोल्हापूर जिल्हा बँकेच्या शाखेवर ईडीने छापेमारी केली. ईडीच्या पथकाने तब्बल 30 तास छप्पेमारी करत बँकेच्या पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर जिल्हा बँकेतील कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज (3 फेब्रुवारी) सकाळी एक तास कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत ईडीच्या कारवाईचा निषेध केला. दुसरीकडे, गुरुवारी सायंकाळी सुद्धा अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचे समजल्यानंतर कर्मचारी आक्रमक झाले होते. त्यामुळे आजही त्याचे पडसाद उमटले.
‘ईडी’विरोधात कर्मचारी आक्रमक
दरम्यान, गुरुवारी कोल्हापुरात मुख्य बँक शाखेच्या प्रांगणात कर्मचाऱ्यांनी एकत्रित जमताना जोरदार घोषणाबाजी केली. ईडीकडून समन्स बजावण्यात आलं असलं, तरी शुक्रवारी हजर करु अशी विनंती कर्मचाऱ्यांनी केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आल्याने कर्मचारी आक्रमक झाले होते. निषेधाच्या घोषणा कर्मचाऱ्यांनी दिल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. 30 तासांपासून बँकेमध्ये कारवाई सुरुच असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच अस्वस्थता होती. गुरुवारी सकाळपासून आपापले विभाग सोडायचे नाहीत असे आदेश देण्यात आले होते. चारच्या सुमारास सर्व कर्मचाऱ्यांना बँकेतून खाली पाठवल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचे समजताच कर्मचारी आक्रमक झाले.
30-30 तास चौकशी केल्याने अधिकारी तणावाखाली आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीला काही झाल्यास सर्वस्वी ईडी जबाबदार असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला होता
पाच अधिकारी ताब्यात
ईडीने 30 तास छापेमारी करताना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्यासह मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांना गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतले. ईडीने तब्बल 30 तास ब्रिक्स व संताजी घोरपडे साखर कारखान्याची संबंधित सर्व व्यवहारांची कसून चौकशी केली. गुरुवारी सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी माने, पत देखरेख विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, सहाय्यक व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, निरीक्षक सचिन डोणकर आणि राजू खाडे यांना समाज बजावून ईडीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, सरसेनापती संताजी घोरपडे, ब्रिक्स, बिद्री व भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारांबाबत चौकशी झाल्याची माहिती आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून कर्ज प्रकरणाबाबत माहिती घेऊन चौकशी करण्यात आली. कापशी शाखेतील सर्व शेतकरी ठेव पावत्यांची झेरॉक्स प्रत घेतल्याची माहिती आहे.

Previous Post

संत सेवालाल महाराजांचा अश्वारुढ पुतळा पोहरादेवीच्या दिशेने रवाना, भव्य बाईक रॅलीचे आयोजन

Next Post

जप्त केलेल्या 23 वाहनांचा 15 फेब्रुवारीला ई- लिलाव

Related Posts

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
Next Post
जप्त केलेल्या 23 वाहनांचा 15 फेब्रुवारीला  ई- लिलाव

जप्त केलेल्या 23 वाहनांचा 15 फेब्रुवारीला ई- लिलाव

ताज्या बातम्या

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026